34 C
Mumbai
Saturday, June 3, 2023
घरदेश दुनियाइस्रोचे सर्वात लहान रॉकेट एसएसएल- डी २ अंतराळात झेपावले

इस्रोचे सर्वात लहान रॉकेट एसएसएल- डी २ अंतराळात झेपावले

Google News Follow

Related

इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन अर्थात इस्रोने एसएसएल- डी २ हे नवीन स्मॉल सॅटेलाइट लॉन्चिंग व्हेईकल लाँच केले आहे. श्रीहरिकोटा येथील सतीश धवन लॉन्च सेंटर येथून शुक्रवारी हे लहान रॉकेट अंतराळात झेपावले. एसएसएलव्ही – डी २ हे आपल्या सोबतच्या उड्डाणात ३ उपग्रह प्रक्षेपित करणार आहे. सतीश धवन लॉन्च सेंटर येथून सकाळी ९ वाजून १८ मिनिटांनी हे प्रक्षेपण करण्यात आले.

इस्रोची ही स्मॉल सॅटेलाइट लॉन्च व्हेईकलची दुसरी आवृत्ती प्रक्षेपित केली आहे. इस्रोच्या म्हणण्यानुसार, हे रॉकेट इस्रोचा पृथ्वी निरीक्षण उपग्रह इओएस-०७ अमेरिकेच्या अँटारिसच्या जॅन्यूस -१ आणि चेन्नईच्या स्पेस किडझ इंडियाचा आझादीसॅट -२ असे तीन उपग्रह ४५० किमीच्या वर्तुळाकार कक्षेत ठेवेल. एसएसएलव्ही – डी २ पृथ्वीच्या खालच्या कक्षेत १५ मिनिटांपर्यंत उड्डाण करेल

एसएसएलव्ही चा उद्देश लहान उपग्रह प्रक्षेपित करणे आहे. इस्रोने५५० किलो वजन कमी पृथ्वीच्या कक्षेत उचलण्याची क्षमता असलेले एसएसएलव्ही विकसित केले आहे. हे लहान उपग्रह पृथ्वीच्या कक्षेत ठेवण्यावर आधारित आहे. एसएसएलव्ही – डी २ चे एकूण वजन १७५.२ किलोग्रॅम आहे. यामध्ये इओएस-०७ चे वजन १५६. ३ किलो, जॅन्यूस -१ चे १०. २ किलो आणि ८.७ किलो वजन आझादीसॅट -२ चे आहे.

हे ही वाचा:

बहुप्रतीक्षित डबल डेकर वातानुकूलित ई बस सेवा पुढील आठवड्यात सुरु

पीएफआयला २०४७ पर्यंत भारतात स्थापन करायचे होते इस्लामिक राज्य

उद्धव ठाकरेंसमोर त्यांचेच उपनेते वादाला पेटले

राष्ट्रवादीचे औरंगजेब प्रेम पुन्हा जागृत

आता आपल्याकडे नवीन प्रक्षेपण वाहन आहे.एसएसएलव्ही – डी २ ने दुसऱ्या प्रयत्नात उपग्रहांना कक्षेत यशस्वीरित्या सोडले आहे. तिन्ही उपग्रह टीमचे अभिनंदन. अशा शब्दात इस्रोचे प्रमुख सोमनाथ यांनी प्रक्षेपणानंतर प्रतिक्रिया व्यक्त करतांना सांगितले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,851चाहतेआवड दर्शवा
2,022अनुयायीअनुकरण करा
76,300सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा