34 C
Mumbai
Tuesday, May 21, 2024
घरक्राईमनामापीएफआयला २०४७ पर्यंत भारतात स्थापन करायचे होते इस्लामिक राज्य

पीएफआयला २०४७ पर्यंत भारतात स्थापन करायचे होते इस्लामिक राज्य

महाराष्ट्र एटीएसचा खळबळजनक गौप्य्स्फोट

Google News Follow

Related

केंद्र सरकारने गेल्या वर्षी बंदी घातलेल्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाला (पीएफआय) २०४७ पर्यंत भारतात इस्लामिक राज्य स्थापन करायचे होते असा मोठा गौप्य्स्फोट महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) दावा केला आहे. आपला उद्देश साध्य करण्यासाठी परदेशी किंवा इतर संघटनांच्या मदतीने शस्त्रे आणि दारूगोळा मिळविण्याची योजना होती असे महाराष्ट्र एटीएसने म्हटले आहे. महाराष्ट्र एटीएसने पीएफआय सदस्य मजहर मन्सूर खान यांच्या घरातून सात पानांची पुस्तिका जप्त केल्याचा दावा केला आहे, ज्यामध्ये २०४७ पर्यंत भारतात इस्लामिक राजवट आणण्याचे म्हटले आहे.

एटीएसने पाच पीएफआय सदस्यांविरुद्ध दाखल केलेल्या आरोपपत्रात हा गौप्य्स्फोट केला आहे. या लोकांना गेल्या वर्षी बेकायदेशीर कारवायांमध्ये सहभागी होण्याच्या आणि देशाविरुद्ध युद्ध पुकारल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. महाराष्ट्र एटीएसने गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये वेगवेगळ्या राज्यांमध्ये छापे टाकल्यानंतर मजहर खान, सादिक शेख, मोहम्मद इक्बाल खान, मोमीन मिस्त्री आणि आसिफ हुसेन खान पाच पीएफआय सदस्यांना अटक केली होती.

हे ही वाचा:

गल्ल्यांबद्दल कमीपणा वाटून घेण्याची गरजच नाही.

रेपो दरात वाढ.. गृहकर्जाचा हप्ता महागणार

३०,००० जखमी..६,००० इमारतींची पडझड…१.५ लाख बेघर.. ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यासाठी टाहो

श्रद्धाच्या हाडांची पावडर करून आफताबने रस्त्यांवर विखुरली

एटीएसने २ फेब्रुवारी रोजी दाखल केलेल्या आरोपपत्रात यासंदर्भातील दस्तऐवज जप्त केल्याचा दावा केला आहे. हिंदू संघटनांना खिंडार पाडण्याचाही पीएफआयचा मोठा कट होता असा दावाही एटीएसने आरोपपत्रात केला आहे. आरोपपत्रात दावा करण्यात आला आहे की आरोपी इक्बालच्या उपकरणातून जप्त केलेल्या आणखी एका दस्तऐवजात त्याच्या महाराष्ट्रातील विस्ताराच्या योजनांची माहिती दिली आहे. एटीएसने दावा केला आहे की पीएफआयने आपले उद्दिष्ट साध्य करण्यासाठी परदेशी किंवा इतर संघटनांच्या मदतीने शस्त्रे आणि दारूगोळा मिळविण्याची योजना आखली होती.

चेंबूर, धारावी, कुर्ला, ठाणे, नेरूळ, पनवेल आणि मुंब्रा येथे पीएफआय सदस्यांनी घेतलेल्या गुप्त बैठकीत कट कारस्थानं रचली जात असल्याचंही एटीएसने म्हटलंय. पीएफआयचे सदस्य हे देश आणि सरकारनिरोधात कट रचत आहे. मुस्लिम तरुणांना भडकावून देशात हिंसाचार करण्याचं कारस्थान रचलं जात होतं, असेही एटीएसने आपल्या आरोपपत्रात म्हटलं आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
154,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा