26 C
Mumbai
Monday, February 26, 2024
घरधर्म संस्कृतीजय श्रीराम: राम मंदिरात होणाऱ्या प्राणप्रतिष्ठेसाठी पंतप्रधान मोदींचे ११ दिवसांचे विशेष अनुष्ठान

जय श्रीराम: राम मंदिरात होणाऱ्या प्राणप्रतिष्ठेसाठी पंतप्रधान मोदींचे ११ दिवसांचे विशेष अनुष्ठान

जनतेला विशेष संदेश देत दिली माहिती

Google News Follow

Related

देशासह जगभरात सध्या अयोध्येतील राम मंदिरात होणाऱ्या प्राणप्रतिष्ठेची चर्चा आहे. साऱ्या देशवासीयांचा उत्साह दिसून येत आहे. येत्या २२ जानेवारी रोजी अयोध्येतील राम मंदिरामध्ये रामलल्लांची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर देशवासीयांना उद्देशून एक ऑडिओ संदेश जारी केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या संदेशामध्ये राम मंदिरात होणाऱ्या प्राणप्रतिष्ठेच्या पार्श्वभूमीवर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

“जीवनाचे काही क्षण ईश्वराच्या आशीर्वादामुळेच प्रत्यक्षात उतरत असतात. आज जगभरातल्या राम भक्तांसाठी असंच पवित्र वातावरण आहे. सर्वत्र प्रभू श्रीराम यांच्या भक्तीचं अद्भुत वातावरण आहे. चारही दिशांना रामनामाचा जप ऐकू येतो आहे. प्रत्येकाला २२ जानेवारीची प्रतीक्षा आहे. आता अयोध्येत प्राणप्रतिष्ठेसाठी फक्त ११ दिवस उरले आहेत. या पुण्यप्रसंगाचा साक्षीदार होण्याची संधी मिळत आहे. ही कल्पनेच्या पलीकडची अनुभूती आहे. याप्रसंगी भावुक झालो आहे. पहिल्यांदा आयुष्यात अशा प्रकारच्या मानसिक स्थितीतून जात आहे. हा अनुभव एक वेगळीच संधी आहे,” असं नरेंद्र मोदी आपल्या संदेशामध्ये म्हणाले आहेत.

“अनेक पिढ्यांनी वर्षानुवर्षं जे स्वप्न उराशी बाळगलं होतं, मला त्या स्वप्नपूर्तीवेळी उपस्थित राहण्याचं भाग्य लाभलं आहे. ईश्वराने मला सर्व भारतीयांचं प्रतिनिधित्व करण्याचं निमित्त बनवलं आहे. ही फार मोठी जबाबदारी आहे,” अशा भावना नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केल्या आहेत.

हे ही वाचा:

‘अग्निपथ योजनेला सर्वांचीच मान्यता’

ईडी अधिकाऱ्यांवरील हल्ल्याच्या पाच दिवसांनंतरही शाहजहां यांचा ठावठिकाणा नाही!

राम मंदिराचे आमंत्रण धुडकावल्याने काँग्रेसमध्येच नाराजी!

केरळच्या प्राध्यापकाचा हात कापणारा पीएफआयचा सदस्य १२ वर्षांनी जेरबंद!

“शास्त्रांमध्येही सांगितलं आहे की, आपल्याला ईश्वराच्या यज्ञासाठी आराधना करण्यासाठी स्वतःमध्येही दैवी चेतना जागृत करावी लागते. शास्त्रांमध्ये व्रत आणि कठोर नियम सांगितले आहेत. या नियमांचं प्राणप्रतिष्ठेच्या आधी पालन करावं लागतं. त्यामुळेच मला आध्यात्मिक व्यक्तींकडून जे मार्गदर्शन मिळालं, त्यांनी जे नियम सांगितले आहेत, त्यानुसार मी आजपासून ११ दिवसांचं विशेष अनुष्ठान सुरू करत आहे. या पवित्र क्षणी मी परमात्म्याच्या चरणांशी, जनतेला प्रार्थना करतोय की, तुम्ही सगळ्यांनी मला आशीर्वाद द्या. जेणेकरून माझ्याकडून कोणतीही कमी राहणार नाही. या ११ दिवसांच्या अनुष्ठानची सुरुवात मी नाशिकधाम पंचवटीपासून सुरू करतोय हे माझं भाग्य आहे. पंचवटीमध्ये प्रभू श्रीराम यांनी बऱ्याच कालावधीसाठी वास्तव्य केलं होतं,” असं मोदींनी यावेळी जाहीर केलं आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
131,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा