29 C
Mumbai
Saturday, April 20, 2024
घरधर्म संस्कृतीराणा अयुबने चक्क सलमान रश्दींचे समर्थन केले मग केले ट्विट डिलिट

राणा अयुबने चक्क सलमान रश्दींचे समर्थन केले मग केले ट्विट डिलिट

Google News Follow

Related

वादग्रस्त ट्विट करण्याबद्दल प्रसिद्ध असलेली आणि आर्थिक घोटाळ्यात नाव असलेली वॉशिंग्टन पोस्टची स्तंभलेखिका राणा अयुब हिने चक्क सलमान रश्दी यांच्या प्रकृतीला आराम पडावा असे ट्विट केल्यानंतर तिला सोशल मीडियावर मुस्लिम समर्थकांनीच झोडून काढले. मग तिने आपले हे ट्विट डिलिट केले.

राणा अयुबने आपल्या ट्विटमध्ये म्हटले होते की, सलमान रश्दी यांच्या प्रकृतीला आराम पडू दे. त्याविषयीचे अपडेट मला मिळावेत.

तिच्या या ट्विटवर तिच्या समर्थकांनी मात्र राळ उडविली. एकाने म्हटले की, आम्ही राणा अयुबचा आदर करतो पण ज्याने आमच्या मोहम्मद पैगंबरांचा अपमान केला, त्याचे समर्थन आम्हाला मंजूर नाही. म्हणून मी राणा अयुबला अनफॉलो करत आहे.

हे ही वाचा:

देशाचै पाऊल लवकरच ५ जी मोबाईल युगाकडे

मुकेश अंबानी आणि कुटुंबीयांना धमकीचा काॅल

संस्कृती, परंपरेचे दर्शन घडवणारा कन्नड सिनेसृष्टीचा व्हीडिओ व्हायरल

हिमाचलमध्ये सामूहिक धर्मांतर करणाऱ्यास आता १० वर्षाची शिक्षा

 

सलमान रश्दी यांनी सॅटॅनिक वर्सेस हे अत्यंत वादग्रस्त असे पुस्तक लिहिले आहे. प्रेषित मोहम्मद यांच्यावर विनोदी पद्धतीने टीका करणारे हे पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर रश्दी यांची हत्या करण्याची फर्माने निघाली. त्यामुळे रश्दी यांनी सुरक्षित ठिकाणी आसरा घेतला. आता न्यूयॉर्कमध्ये भाषणादरम्यान त्यांच्यावर एका माणसाने हल्ला केला आणि त्यांच्या मानेवर वार केला. रश्दी यांच्यावर आता उपचार सुरू आहेत. त्यावरून राणा अयुबने त्यांच्या प्रकृतीला आराम पडावा यासाठी प्रार्थना केली होती. पण नंतर तिला आपली चूक लक्षात आल्यावर तिने ट्विट डिलिट केले.

एकाने तिला प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, मी राणा अयुबचा केव्हीही फॅन नव्हतो. पण पश्चिमेच्या देशांना अनुकूल असे लिखाण ती करते. तिथल्या वाचकांना खुश करण्यासाठी ती रश्दींचे समर्थन करत आहे. रश्दींवर झालेल्या हल्ल्याचे समर्थन नाही पण अशा व्यक्तीबद्दल सहानुभूतीही नको.

एका मुस्लिम ट्विटर वापरकर्त्याने म्हटले आहे की, मुस्लिमांचा आवाज बनल्याबद्दल प्रारंभी मी तिचा फॉलोअर होतो पण इन्स्टाग्रामवरील तिचे फोटो पाहिल्यानंतर ती इस्लामच्या म्हणण्याप्रमाणे वस्त्रे परिधान करत नसल्याने ती आपली कारकीर्द घडविण्यासाठीच हे सगळे करत असल्याचे लक्षात आले.

राणा अयुबने तर सुकेतू मेहता यांचे ट्विटही लाईक केले होते. त्यांनी रश्दी यांना लायन ऑफ बॉम्बे असे म्हटले होते. पण नंतर राणा अयुबने ते ट्विट अनलाइक केले.

 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
147,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा