जानेवारीच्या २२ तारखेला रामललाच्या प्राणप्रतिष्ठापणेचा सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्याची तयारी युद्धपातळीवर सुरू असून मंदिराचे बांधकामही आता अंतिम टप्प्यात आले आहे. मंदिरात लागणाऱ्या दरवाज्यांचे काम जोरदार सुरू असून मंदिरातील इतर गोष्टींप्रमाणे हे दरवाजेही विशेष असणार आहेत.
राम मंदिरात बसवण्यात येणाऱ्या दरवाजाची उंची ९ फूट तर लांबी १२ फूट इतकी आहे. हे दरवाजे महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यामधील सागवान लाकडापासून बनविण्यात येत आहेत. गडचीरोली जिल्ह्यातील सागवान हे संपूर्ण आशिया खंडात प्रसिद्ध आहे. त्यामुळे या अस्सल सागवानाचे दरवाजे अयोध्येतील मंदिरासाठी तयार होत आहेत. यामध्ये मुख्य प्रवेश दाराचा देखील समावेश करण्यात आला आहे.
मंदिराच्या दारांवर अतिशय आकर्षक असं नक्षीकाम करण्यात येत आहे. अनुराधा इंटरनॅशनल टिम्बर कंपनीकडे या कामाची जबाबदारी सोपावण्यात आली आहे. कुशल आणि अनुभवी कारागिरांकडून नगर शैलीत कोरीव नक्षीकाम सुरू आहे. या दरवाजांना सोन्याचा मुलामा देण्यात येणार आहे. त्यामुळे राम मंदिराचे दरवाजे विशेष असणार आहेत.
राम मंदिराच्या निर्माणामुळे उत्तर प्रदेशातील अयोध्या शहराचा कायापालट होत असतानाचं भविष्यात अयोध्येचे रुपडे आणखी पालटणार आहे. मास्टर प्लॅन २०३१ नुसार ८५ हजार कोटी रुपयांहून अधिक गुंतवणुकीसह १० वर्षांमध्ये अयोध्येचा कायापालट पूर्ण होणार आहे. राम मंदिराच्या उद्घाटनानंतर दररोज सुमारे ३ लाख रामभक्त येण्याची गरज पूर्ण करण्यासाठी या पावन शहराचे अपग्रेडेशन होणार आहे. या मास्टर प्लॅनमुळे अयोध्येचा चेहरामोहरा बदलून जाणार असून या योजनेत १ हजार २०० एकरांवर पसरलेल्या वेगळ्या नवीन टाऊनशिपचा समावेश आहे,
हे ही वाचा:
अजित पवार म्हणाले, ८० वय झालं तरी माणूस थांबत नाही
पोटातून आणलेली कोकेनची कॅप्सूल पकडली; सकिनाका येथे दोन विदेशी नागरिकांना अटक!
मराठी माणसाच्या नाट्यप्रेमामुळे १०० वर्षांची परंपरा लाभली!
या सोहळ्याला देशभरातील नामवंत व्यक्तींना निमंत्रित करण्यात आलं आहे.यामध्ये कलाकार, साहित्यिक, धार्मिक नेते आणि क्रीडा जगतातील मोठ्या व्यक्तींचा समावेश आहे.या प्राण प्रतिष्ठेसाठी तब्ब्ल ७ हजार जणांना आमंत्रण देण्यात आलं आहे. अयोध्येतील नव्या राम मंदिराचे उद्घाटन आणि प्रभू श्री रामाचा अभिषेक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.