26 C
Mumbai
Monday, February 26, 2024
घरविशेषमराठी माणसाच्या नाट्यप्रेमामुळे १०० वर्षांची परंपरा लाभली!

मराठी माणसाच्या नाट्यप्रेमामुळे १०० वर्षांची परंपरा लाभली!

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाट्य संमेलनाचे केले उदघाटन

Google News Follow

Related

१०० वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन सध्या पुण्यामध्ये सुरू आहे.नाट्य संमेलनाच आजचा( शनिवार, ६ जानेवारी) दुसरा दिवस आहे. संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्यावेळी पुण्यनगरीचा मानबिंदू असलेल्या बालगंधर्व रंगमंदिरापासून ते गणेश कला क्रीडा मंचापर्यंत ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत नाट्य यात्रा काढण्यात आली.नाट्य संमेलनावाच्या दुसऱ्या दिवशी दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि मंत्री उदय सामंतसह आदी नेते उपस्थित होते. या संमेलनाचे नियोजित अध्यक्ष जब्बार पटेल तर नाट्य परिषदेचे अध्यक्ष अभिनेते प्रशांत दामले आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाट्य क्षेत्रातील सर्व कलावंत, दिग्दर्शक आणि प्रेक्षकांचे स्वागत करून आपल्या भाषणाला सुरुवात केली.ते म्हणाले की, मराठी माणसाच्या नाट्यप्रेमामुळे नाट्यसंमेलनाला १०० वर्षांची ही गौरवशाली परंपरा लाभली आहे.देशात नाट्य कलेला २ हजार वर्षांची दीर्घ परंपरा लाभली आहे. मराठी रंगभूमीची सुरुवात विष्णुदास भावे यांच्या सीता स्वयंवर नाटकाने झाल्यानंतर मराठी रंगभूमीने अनेक बदल पाहिले आहेत. अनेक थोर कलाकारांच्या योगदानातून मराठी रंगभूमी बहरली. नाटक रसिकांच्या पसंतीस उतरण्यासाठी आशय, विषय, सादरीकरण, संगीत याची चाकोरी मोडण्याची गरज असते, मराठी रंगभूमीने ते केल्याने या रंगभूमीचा उत्कर्ष होत आहे.

आज समाजमाध्यमांच्या काळातही प्रेक्षक नाटकांना गर्दी करतात. व्यावसायिक सोबत प्रायोगिक रंगभूमीलाही चोखंदळ प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे. हजारो कलाकार आणि पडद्यामागील कलावंतांनी यासाठी योगदान दिले आहे. गेल्या १०० वर्षात सुवर्णकाळ अनुभवताना अनेक अडचणींवर मात करीत रंगभूमी पुढे जात आहे. म्हणूनच या रंगभूमीचा आनंद सोहळा दिमाखात साजरा होत आहे, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

मराठी नाट्य परिषदेसाठी मुंबईत भूखंड देण्याबाबत सहकार्य करण्यात येईल. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नाट्यगृहात पूर्वीप्रमाणे विजेचा खर्च आकारला जाईल. ज्येष्ठ कलावंतांच्या घराबाबतही शासन सकारात्मक आहे. नाट्यसृष्टीच्या उत्कर्षासाठी एकत्रित प्रयत्न करताना मराठी रंगभूमीसाठी शासनाकडून सर्व प्रकारचे सहकार्य करण्यात येईल अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिली.

हे ही वाचा:

निवडणुकीपूर्वी बांग्लादेशात हिंसाचार, मतदान केंद्राला लावली आग!

मार्कोस कमांडोनी जहाज घेतले ताब्यात; वाचवले भारतीयांचे प्राण!

हॉलिवूड अभिनेत्याचे विमान समुद्रात कोसळले; मुलींनीही जीव गमावला!

बंगाल रेशन घोटाळ्याप्रकरणी तृणमूल काँग्रेसचे नेते शंकर आध्येंना अटक!

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे म्हणाले की, मराठी रंगभूमीच्या विकासासाठी शासन प्रयत्नशील आहे. यंदा १०० वे नाट्य संमेलन असल्याने नाट्य संमेलनासाठी ९ कोटी ८३ लाख आणि मुंबई येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहासाठी १० कोटींचा निधी देण्यात आला आहे. सांस्कृतिक कार्य विभागाकडून नवी नाट्यगृहे उभारण्यात येणार आहेत मात्र हे करतांना नाट्य कलावंतांच्या मागणीनुसार जुन्या नाट्यगृहाच्या दुरुस्तीसाठी नगरविकास विभागाच्या माध्यमातून कार्यवाही करण्यात येईल. वृद्ध कलावंतांचे मानधन वाढविण्यात येईल हे सांगतानाच मराठी रंगभूमीचे प्रश्न सोडविण्यासाठी लवकरच बैठकीचे आयोजन करण्यात येईल असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांनी चिंचवडच्या पावन भूमीत नाट्य संमेलन होत असल्याबाबत आनंद व्यक्त केला.शरद पवार म्हणाले, सर्व कलांचा संगम असलेली रंगभूमी सर्वाधिक परिणामकारक माध्यम आहे. नाट्याचा मुख्य उद्देश मनोरंजन असल्याचे भरतमुनी यांनी म्हटले आहे, मात्र नाटकाच्या माध्यमातून प्रबोधन आणि ज्ञानदानाचे कार्य उत्तमरीतीने होते. रंगभूमीच्या माध्यमातून अनेक वर्षे लोकप्रबोधनाचे कार्य होत आहे. मराठी नाट्यसृष्टीद्वारे नवे विषय मांडले जात आहेत. नाट्य रसिकांना नाटकांकडे आकर्षित करणारी नाटके रंगभूमीवर यावीत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. नाट्य संमेलनाच्या निमित्ताने राज्याच्या विविध भागात कार्यक्रमांचे आयोजन होणार असल्याने नाट्यरसिकांना ही मोठी पर्वणी आहे, असे शरद पवार म्हणाले.

उद्योगमंत्री उदय सामंत संमेलनात म्हणाले की, पिंपरी चिंचवड येथे नाट्य संमेलनाचा निर्णय एकमताने घेण्यात आला होता. या नाट्य संमेलनानंतर कलाकार आणि पडद्यामागील कलावंतांचे प्रश्न सोडविण्यासाठी  बैठकीचे आयोजन व्हावे आणि ज्येष्ठ कलाकारांच्या वृद्धाश्रमासाठी शासनाने निधी द्यावा,अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. शासनातर्फे नाट्य संमेलनासाठी प्राप्त निधीचा उपयोग कलाकार आणि पडद्यामागील कलावंतांना मानधन आणि आरोग्य विमा काढण्यासाठी करण्यात येईल, असे उदय सामंत म्हणाले.

नाट्य नियोजित अध्यक्ष जब्बार पटेल यांनी देखील संमेलनात आपले मत व्यक्त केले.ते म्हणाले की, मराठी रंगभूमी प्रगल्भ आणि विविधतेने नटलेली आहे. नाट्य प्रशिक्षणाच्या माध्यमातून  रंगभूमीचा अधिक विकास होईल. देशपातळीवरील उत्तम कलाकारांच्या माध्यमातून विद्यापीठातून नाट्यकलेचे प्रशिक्षण आणि संशोधन व्हावे, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

नाट्य संमेलनाचे अध्यक्ष प्रशांत दामले यांनीदेखील यावेळी विचार व्यक्त केले. ते म्हणाले की, नाट्य संमेलन हे कलावंतांसाठी दिवाळी असून एकत्रित विचार करण्याची उत्तम जागा आहे.आपण २२ ठिकाणी नाट्यजागर घेतोय.यामध्ये विविध एकांकिका स्पर्धा, बालनाट्य स्पर्धा आहेत.यामध्ये आतापर्यंत ६७०० रंगकर्मीनी सहभाग नोंदवल्याचे त्यांनी सांगितले.आपण लवकरच १० हजार आकडा पार करू अशी मला आशा असल्याचे दामले म्हणाले.

व्यासपीठावर असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, मंत्री उदय सामंत या दिग्गज नेत्यांसमोरच प्रशांत दामलेंनी त्यांच्या खास शैलीतून राजकारण्यांचे कान टोचले.ते म्हणाले की, आम्ही कलाकार फक्त तीन तास नाटक करतो.मात्र, मंचावर उपस्थित हे ३६५ दिवस २४ तास अभिनयच करत असतात.त्यांच्या कार्याला सलाम.हे अचानक अध्यक्षपद मिळाल्याने मला मुख्यमंत्री झाल्यासारखं वाटतंय.पण उत्तम गोष्ट ही की माझे सहकारी माझेही बाप आहेत, असे प्रशांत दामले यावेळी म्हणाले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
131,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा