33 C
Mumbai
Sunday, December 7, 2025
घरधर्म संस्कृतीजय श्रीराम: रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठेसाठी बोलावणार हुतात्मा कारसेवकांच्या कुटुंबियांना

जय श्रीराम: रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठेसाठी बोलावणार हुतात्मा कारसेवकांच्या कुटुंबियांना

२२ जानेवारी रोजी अयोध्येत प्रभू रामाच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा पार पडणार

Google News Follow

Related

२२ जानेवारी रोजी अयोध्येत प्रभू रामाच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्याला देशभरातील नामवंत व्यक्तींना निमंत्रित करण्यात आलं आहे. यामध्ये कलाकार, साहित्यिक, धार्मिक नेते आणि क्रीडा जगतातील मोठ्या व्यक्तींचा समावेश आहे. याशिवायही अनेकांना निमंत्रण देण्यात आले आहे. यासाठी बनविण्यात आलेल्या श्रेणींची माहिती समोर आली आहे. अयोध्येतील नव्या राम मंदिराचे उद्घाटन आणि प्रभू श्री रामाचा अभिषेक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

निमंत्रितांच्या बनविण्यात आलेल्या विविध श्रेणी

  • हुतात्मा कारसेवकांचे कुटुंबीय.
  • चळवळीतील नेत्यांचे कुटुंबीय.
  • न्यायिक प्रक्रियेत प्रतिनिधित्व करणाऱ्या वकिलांचा गट.
  • १५० हून अधिक परंपरांचे संत, कथाकार, मठांचे विश्वस्त, मंदिरे, पुजारी इ.
  • नेपाळमधील संत समाजातील प्रमुख लोक.
  • जैन, बौद्ध आणि शीख समुदायांचे मित्र (भारतीय पंथांचे प्रतिनिधी).
  • प्रमुख देणगीदार.
  • आदिवासी समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती.
  • भटक्या जाती आणि इतर जमातींचे लोक.
  • अनुसूचित समाजातील प्रमुख लोक (उदाहरणार्थ, आंबेडकर जी, जगजीवन राम जी, काशीराम जी यांचे कुटुंबीय).
  • प्रसिद्ध वृत्तपत्रे/वृत्तवाहिन्यांचे प्रमुख व्यक्ती.
  • स्वयंसेवी संस्था, नोबेल पारितोषिक, भारतरत्न, परमवीर चक्र, पद्म पुरस्कार इत्यादींनी सन्मानित बंधू-भगिनी.
  • सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त सरन्यायाधीश (तीन), तिन्ही सैन्याचे निवृत्त लष्कर प्रमुख, माजी राजदूत, प्रशासकीय/पोलीस सेवा अधिकारी ज्यांनी विविध महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे.
  • प्रख्यात शिक्षणतज्ज्ञ, विचारवंत, कवी, कलाकार, साहित्यिक, शेतकरी, मजूर, खेळाडू इ.
  • प्रमुख राजकीय पक्षांचे अध्यक्ष.
  • अयोध्या जिल्ह्यातील सर्व पक्षांचे स्थानिक लोकप्रतिनिधी.
  • उद्योजक, उद्योगपती आणि उद्योजक.
  • याशिवाय ५० देशांतील भारतीय समाजातील ५५ लोक.

हे ही वाचा:

सर्वाधिक मौल्यवान कंपनी म्हणून मायक्रोसॉफ्टची ऍप्पलवर मात!

जय श्रीराम: राम मंदिरात होणाऱ्या प्राणप्रतिष्ठेसाठी पंतप्रधान मोदींचे ११ दिवसांचे विशेष अनुष्ठान

२६/११ मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना प्रशिक्षण देणाऱ्या हाफिज भुट्टावीच्या मृत्युच्या वृत्ताला युएनचा दुजोरा

गावातून पळून गेलेले जोडपे मुलासह पुन्हा परतले, तिघांची गोळ्या घालून केली हत्या!

टेंट सिटी, आश्रम आणि घरात या विशेष पाहुण्यांची निवास व्यवस्था करण्यात आली आहे. प्रत्येकजण आपापल्या वाहतूक व्यवस्थेने अयोध्येत दाखल होणार आहेत. तर, तिथे त्यांची भोजन, निवास, शहर वाहतूक आदी व्यवस्था ट्रस्टतर्फे करण्यात येणार आले.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा