25 C
Mumbai
Wednesday, September 11, 2024
घरन्यूज खिडकीराजस्थान: उदयपूरमध्ये हिंसाचारानंतर नागरी सुरक्षा संहितेचे कलम 163 लागू; शाळा, इंटरनेट सर्व...

राजस्थान: उदयपूरमध्ये हिंसाचारानंतर नागरी सुरक्षा संहितेचे कलम 163 लागू; शाळा, इंटरनेट सर्व बंद!

CrPC कलम 144 नागरी सुरक्षा संहितेतील कलम 163 मध्ये बदलण्यात आले आहे, म्हणजेच त्याच्या अंमलबजावणीसह, कलम 144 च्या सर्व तरतुदी लागू होतात. सोबतच शुक्रवारी रात्री १० वाजल्यापासून २४ तास इंटरनेट सेवा बंद ठेवण्याचे आदेश विभागीय आयुक्तांनी दिले आहेत.

Google News Follow

Related

उदयपूरमध्ये शुक्रवारी दुपारी शाळेतील भांडणाचे रुपांतर जीवघेण्या चाकूबाजी मध्ये झाले. दोन विद्यार्थ्यांमध्ये झालेल्या या  हाणामारीने संपूर्ण शहरात हिंसक वातावरण पसरले. शुक्रवारच्या दुपारी उन्मादी जमावाने एकत्र दगडफेक सुरू केली. शहरातील दुकाने आणि शॉपिंग मॉल्सवर दगडफेक आणि गाड्यांची जाळपोळीच्या घटनांनी शहराचे वातावरण गढूळ झाले आहे. हिंसक जमावाच्या हल्ल्याने परिस्थिती इतकी बिघडली की सायंकाळपर्यंत पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. शेवटी जिल्हाधिकाऱ्यांनी नागरी सुरक्षा संहिता २ ० २ ३ च्या कलम 163 द्वारे शांतता प्रस्थापित केली. शनिवारपासून शहरातील शाळा, कॉलेजपासून, सर्वच प्रकारची जमावबंदी करण्यात आली आहे.

शुक्रवारी उदयपूरच्या सूरजपोल पोलीस ठाणे हद्दीतील भट्टियानी चौहट्टा येथील सरकारी उच्च माध्यमिक विद्यालयात दहावीच्या दोन विद्यार्थ्यांमध्ये हाणामारी झाली. हाणामारी दरम्यान एका विद्यार्थ्यावर चाकूने हल्ला करण्यात आल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या हाणामारीत चाकूने हल्ला करणारा आरोपी विद्यार्थी मुस्लिम समुदायाचा विद्यार्थी आहे. आरोपीने वर्गातील एका हिंदू सोबत बाचाबाची झाल्याने मुलावर चाकूने हल्ला करून घटनास्थळावरून पळ काढला. जखमी विद्यार्थ्याला तातडीने महाराजा भोपाल रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेनंतर शहरातील लोक मधुबन परिसरात जमा झाले आणि त्यांनी आंदोलन करण्यास सुरुवात केली, त्यानंतर मुस्लिम समाजाने दगडफेक करण्यास सुरुवात केली.

हे ही वाचा:

अटल सेतूवरून उडी मारू पाहणाऱ्या महिलेला पोलिसांनी, कारचालकाने वाचवले!, थरारक व्हीडिओ व्हायरल

नाशिक ते कानपूर; जिहादचा ताजा अंक

‘पक्ष मागितला असता तर दिला असता, वर काय घेऊन जायचं आहे?’

सुप्रिया सुळेंचे उत्पन्न अडीच लाखांच्या आत असेल तर त्यांनाही १५०० रु. देऊ!

उदयपूरमध्ये नागरी सुरक्षा संहित २ ० २ ३ च्या कलम 163 अंतर्गत, सर्व खाजगी आणि सरकारी शाळा इयत्ता 1 ते 12 पर्यंत बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.  CrPC कलम 144 नागरी सुरक्षा संहितेतील कलम 163 मध्ये बदलण्यात आले आहे, म्हणजेच त्याच्या अंमलबजावणीसह, कलम 144 च्या सर्व तरतुदी लागू होतात. सोबतच शुक्रवारी रात्री १० वाजल्यापासून २४ तास इंटरनेट सेवा बंद ठेवण्याचे आदेश विभागीय आयुक्तांनी दिले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या पुढील आदेशापर्यंत शाळा, महाविद्यालये बंद राहणार आहेत. कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती पाहता जिल्हा प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. प्रशासनाकडून पुढील आदेश येईपर्यंत शाळा बंद राहणार आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
176,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा