26 C
Mumbai
Thursday, December 9, 2021
घरराजकारण१०० कोटी लसीकरण हे नव्या भारताचे चित्र

१०० कोटी लसीकरण हे नव्या भारताचे चित्र

Related

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज म्हणजेच शुक्रवार, २२ ऑक्टोबर रोजी देशाला संबोधित केले. यावेळी बोलताना त्यांनी १०० कोटी लसीकरणाचा विक्रमी टप्पा पार केल्याबद्दल समस्त भारतीयांचे अभिनंदन केले. तर १०० कोटी लसीकरण हा केवळ आकडा नसून हे नव्या भारताचे चित्र आहे असे पंतप्रधान मोदी म्हणाले. 

मोदी आपल्या भाषणात म्हणाले की, भारताने एकीकडे कर्तव्याचे पालन केले तर दुसरीकडे त्याला सफलताही मिळाली. भारताने एक कठीण आणि असाधारण असे लक्ष्य साद्ध्य केले आहे. ही संपूर्ण भारताची सफलता आहे. १३० करोड जनतेची,  प्रत्येक भारतीयाची सफलता आहे. त्यासाठी सर्व भारतीयांचे अभिनंदन  

१०० कोटी लसीकरण हा केवळ आकडा नसून हा देशाचा नवा चेहरा आहे. देशाच्या सामर्थ्याचे चिन्ह आहे. देशाचा नवा ऐतिहासिक अध्याय आहे. नव्या भारताचे चित्र आहे जो भारत आपल्या संकल्पाच्या सिद्धीसाठी प्रयत्नांची पराकाष्टा करतो.

भारताच्या लसीकरण मोहिमेची तुलना जगातील इतर देशांशी होत आहे. भारताने ज्या प्रकारे १०० कोटींचे लक्ष्य साध्य केले त्याचे कौतुक होत आहे. जगातील बाकीच्या देशांसाठी लस बनवणे सोपे होते. संशोधन करणे सोपे होते. त्यात त्यांचे एक्स्पर्टिज होते. पण भारताचे तसे नव्हते या आधी भारत लसीसाठी इतर देशांवर अवलंबून होता. त्यामुळे जेव्हा ही जागतिक महामारी आली तेव्हा भारतावर प्रश्न उपस्थित केले गेले.

भारत इतक्या मोठ्या प्रमाणात लस कशी खरेदी करणार? त्यास्तही पैसे कुठून आणणार? आपल्या नागरिकांना लास कशा प्रकारे देणार? एवढ्या मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहीम कशी राबवणार? पण भारताने दिलेल्या १०० करोड लसीच्या मात्रा हे या प्रश्नांचे उत्तर आहे. भारताने आपल्या नागरिकांना लस दिली आणि ती पण पूर्णपणे मोफत. त्यामुळे आज जगभरातील लोक कोरोना विरोधात भारतात स्वतःला सुरक्षित समजतात. आज भारत एक औषधी क्षेत्रातील हब म्हणून उदयास येत आहे.

भारताने मिळवलेले हे यश ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका  प्रयासचे’ उदाहरण असल्याचे पंतप्रधान मोदींनी सांगितले. पुढे ते म्हणाले भारतासारख्या लोकशाहीत या महामारीचा सामना करणे कठीण असेल असे म्हटले गेले. इतका संयम आणि शिस्त इथे कशी पाळली जाईल? असे सवाल उपस्थित केले गेले. पण भारताने करून दाखवले. कारण आपल्यासाठी लोकशाही म्हणजे सबका साथ आहे.

जर महामारी भेदभाव करत नाही तर लसही भेदभाव करणार नाही हे भारताने सुनिश्तिच केले. लसीसाठी व्हीआयपी कल्चर चालणार नाही हा निर्णय घेण्यात आला. सर्वांसाठी लस समान प्रकारे दिली जाईल हा निर्णय घेतला गेला आणि तशा प्रकारेच ती दिली गेली आणि ती देखील मोफत. लस घ्यायला भारतीय नागरिक येणार नाहीत असेही म्हटले गेले होते. पण भारतीयांनी १०० कोटी लसी घेऊन त्यांना निरुत्तर केले. कोणत्याही अभियानात जेव्हा सर्वांचे प्रयत्न असतात तेव्हा परिणाम अद्भुत असतो असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

आपण लोक सहभागाला आपली ताकद बनवले. देशाने आपली एकजुटता दाखवून दिली. टाळी, थाळ्या वाजवल्या. दिवे लावले. लोकांनी विचारले कि याने महामारी जाईल का? पण आपण त्यातून आपली एकता दाखवली. अनेकदा देशाने १ कोटी पेक्षा अधिक लसी देण्याचा विक्रम केला आहे. हे आपले सामर्थ्य आहे,  तंत्रज्ञानाचे सामर्थ्य आहे. जे अनेक मोठं मोठ्या देशांनाही शक्य झालेले नाही.

हे ही वाचा:

पवारांच्या शागिर्दाने १५ हजार कोटी रुपये लुटले

सोशल मीडियामध्ये येणार नवे ‘ट्रम्प’कार्ड

आंदोलकांना रस्ते अडवण्याचा अधिकार नाही

केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोदी सरकारकडून मोठी भेट

भारताची संपूर्ण लसीकरण मोहीम हि सायन्स बाउंड, सायन्स ड्रिव्हन होती. सुरवातीपासून या मोहिमेत सायंटिफिक अप्रोच होता. वैज्ञानिक संशोधनातून आपण लस निर्माण केली आणि त्याचप्रकारे आपण वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून आपण ही मोहीमी अधिक वेगवानही केली.

भारताने कोविन प्लॅटफ़ॉर्मची व्यवस्था बनवली. हा प्लॅटफॉर्म हा संपूर्ण जगासाठी आकर्षण बिंदू ठरला आहे. या प्लॅटफॉर्ममुळे आपण जनतेसोबत मेडिकल कर्मचाऱ्यांचे काम सोपे केले.

आज भारतात विक्रमी गुंतवणूक होत आहे. तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत. गृहनिर्माण क्षेत्राला नवी ऊर्जा मिळाली आहे. कोरोना काळात कृषी क्षेत्राने भारताची अर्थव्यवस्था सांभाळली. आज विक्रमी प्रमाणात धान्य खरेदी केले जात आहे. शेतकऱ्यांच्या खात्यात थेट पैसे जमा होत आहेत. खेळ आणि पर्यटन क्षेत्रालाही गती आली आहे. येणाऱ्या सणांच्या मोसमात या सर्व गोष्टींना अधिक वेग मिळेल असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा पंतप्रधानांनी ‘व्होकल फॉर लोकल’ चा नारा दिला आहे. “भारतात बनलेली गोष्ट विकत घेणे, भारतीयांनी बनवलेली गोष्ट विकत घेणे, व्होकल फॉर लोकल आपल्याला आचरणात आणावे लागेल.” असे मोदी म्हणाले. तर गेली दिवाळी तणावात गेली, पण या वेळी १०० कोटी लसीकरणामुळे उत्साह आहे. दिवाळीत होणारी विक्री ही विक्रमी प्रकारे वाढते. संपूर्ण वर्षाची विक्री एका बाजूला आणि दिवाळीत होणारी विक्री एका बाजूला असे चित्र असते. अशातच पार पडलेले १०० कोटी लसीकरण हे छोट्या व्यापाऱ्यांसाठी, विक्रेत्यांसाठी आशेचा किरण बनून आले आहे असे म्हणत त्यांनी छोट्या व्यापाऱ्यांकडून स्वदेशी वस्तू खरेदी करण्याचेही आवाहन केले आहे.  

तर यावेळी पंतप्रधान मोदींनी अजून कोविड विरोधातील लढाई संपलेली नाही असे सांगताना मास्क वापरणे हे सवयीचे झाले पाहिजे असेही ते म्हणाले. “कवच कितीही उत्तम असले, अत्याधुनिक असले, सुरक्षेची हमी देणारे असले तरीही जोवर युद्ध संपत नाही तोवर शस्त्रे टाकली जात नाहीत. त्यामुळे खबरदारी घेतली पाहिजे. मास्क वापरले पाहिजे. ज्याप्रकारे आपल्याला बूट घालून बाहेर पडायची सवय झाली आहे तशी मास्क घालून बाहेर पडायची सवय लागली पाहिजे” असे मोदी म्हणाले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

2,721चाहतेआवड दर्शवा
1,516अनुयायीअनुकरण करा
4,940सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा