29.3 C
Mumbai
Friday, November 6, 2026
घरराजकारणविधानसभेतील गदारोळानंतर बीआरएसचे २२ आमदार निलंबित

विधानसभेतील गदारोळानंतर बीआरएसचे २२ आमदार निलंबित

उर्वरित पावसाळी अधिवेशनासाठी निलंबनाची कारवाई

Google News Follow

तेलंगणा विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात मोठा राजकीय गोंधळ पाहायला मिळाला. सत्ताधारी काँग्रेस आणि विरोधी भारत राष्ट्र समिती (BRS) यांच्यातील संघर्ष वाढला आहे. सभागृहात घोषणाबाजी करत वेलमध्ये (सभागृहाच्या मध्यभागी) उतरून आंदोलन केल्याप्रकरणी बीआरएसचे कार्याध्यक्ष के. टी. रामा राव (KTR) यांच्यासह २२ आमदारांना उर्वरित पावसाळी अधिवेशनासाठी निलंबित करण्यात आले आहे.

तेलंगणातील बिघडलेल्या कायदा-सुव्यवस्थेच्या परिस्थितीवर तातडीने चर्चा करण्याची मागणी बीआरएस आमदारांनी केली होती. तसेच महिला आमदारांशी पोलिसांनी कथितरित्या केलेल्या गैरवर्तनाचा मुद्दाही केटीआर यांनी उपस्थित केला. याशिवाय बीआरएस प्रमुख आणि विरोधी पक्षनेते के. चंद्रशेखर राव यांना धमक्या दिल्याचा आरोप करत या प्रकरणावरही चर्चा करण्याची मागणी करण्यात आली.

हे ही वाचा:

अमेरिकेची मानवरहित पाणबुडी इराणच्या ताब्यात?

‘दीपस्तंभ’ने दिली साथ; दिव्यांगत्वावर केली मात

नोकरी सोडा, अन्यथा मृत्यूला सामोरे जा!

गारद्याचे बंड घडवेल महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप

सभागृहाचे कामकाज सुरू होताच बीआरएस आमदारांनी घोषणाबाजी करत आंदोलन सुरू केले. विधानसभा अध्यक्ष गड्डम प्रसाद कुमार, उपमुख्यमंत्री मल्लू भट्टी विक्रमार्क आणि संसदीय कामकाज मंत्री डी. श्रीधर बाबू यांनी आमदारांना आपल्या जागेवर परतण्याचे आवाहन केले. मात्र, आंदोलन सुरूच राहिल्याने श्रीधर बाबू यांनी निलंबनाचा प्रस्ताव मांडला आणि त्यानंतर २२ आमदारांवर कारवाई करण्यात आली. निलंबित आमदारांमध्ये केटीआर , टी. हरीश राव, जी. जगदीश रेड्डी, पी. सबिता इंद्रा रेड्डी, गंगुला कमलाकर, कौशिक रेड्डी, व्ही. सुनीता लक्ष्मा रेड्डी, के.पी. विवेकानंद यांच्यासह अन्य बीआरएस आमदारांचा समावेश आहे.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
341,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा