27.5 C
Mumbai
Friday, May 3, 2024
घरराजकारणशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या राष्ट्रीय स्मारकासाठी आतापर्यंत ३६ कोटी खर्च

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या राष्ट्रीय स्मारकासाठी आतापर्यंत ३६ कोटी खर्च

Google News Follow

Related

बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाच्या प्रथम टप्प्यातील कामाची भौतिक प्रगती २७ टक्के झाली असून टप्पा १ चे काम २३ मे २०२२ रोजी पूर्ण होणे अपेक्षित असल्याची माहिती एमएमआरडीए प्रशासनाने आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस दिली आहे. सद्यस्थितीत वास्तुविशारद, कंत्राटदार टाटा कंपनी अन्य खर्च अशी एकूण ३५.९७ कोटी रक्कम खर्च झाली आहे.

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी एमएमआरडीए प्रशासनाकडे बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाच्या कामाची विविध माहिती मागितली होती. एमएमआरडीए प्रशासनाने अनिल गलगली यांस कळविले की, सद्यस्थितीत कामाची भौतिक प्रगती २७ टक्के आहे. टप्पा १ चे काम दिनांक २३ मे २०२२ पर्यंत होणे अपेक्षित आहे. एमएमआरडीए प्रशासनाने सद्यस्थितीला ३५.९७ कोटी खर्च केले असून यात वास्तुविशारद, कंत्राटदार टाटा आणि अन्य खर्चाचा समावेश आहे.

वास्तुविशारद आभा लांबा नरियन यांस ६.४७ कोटी रुपयांचे काम दिले असून आजमितीला त्यांस ३.२१ कोटी रुपये देण्यात आले आहे. तर कंत्राटदार टाटा प्रोजेक्ट लिमिटेडला १८०.९९ कोटी रुपयांचे काम देण्यात आले असून त्या कंपनीस २८.९३ कोटी रुपये देण्यात आले आहे. अन्य खर्चात वेगवेगळ्या खात्याची ना हरकत प्रमाणपत्र, मुद्रांक शुल्क, परवानगी शुल्क यावर ३.८२ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत.

हे ही वाचा:

राजेश टोपेंना मिळणार ‘घोटाळेरत्न’ पुरस्कार  

सुप्रिया सुळे कोरोनाच्या कचाट्यात! पती सदानंद सुळेंनाही झाली लागण

माय होम इंडियाचा पुरस्कार कोशंट सुमेर यांना

आघाडीवर कुरघोडी

 

◆ महापौर बंगल्याचा जीर्णोद्धार आणि संग्रहालय पहिल्या टप्प्यात

पहिला टप्पा २५० कोटी रुपयांचा असून यात एंट्रन्स ब्लॉक, आर्टिस्ट सेंटर, इंटरप्रिटेशन सेंटर, हेरिटेज कन्झर्वेशन, महापौर बंगल्याचा जीर्णोद्धार आणि संग्रहालय आणि लँडस्केपिंगमध्ये संवर्धन, परिसराचे सुशोभीकरण या कामाचा समावेश आहे.

◆ १५० कोटींचा दुसरा टप्पा अद्यापही प्रस्तावित

बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाचा दुसरा टप्पा हा १५० कोटींचा असून अद्याप प्रस्तावित आहे. या टप्प्यात तंत्रज्ञान, लेजर शो, डिजिटल मॅपिंग प्रोजेक्शन, कथन, कथाकथन, फिल्म, आभासी वास्तव, संग्रहालय कथनातील ऑडिओ व्हिज्युअल आणि तांत्रिक घटक या कामाचा समावेश आहे.

◆ ४०० कोटींची प्रशासकीय मान्यता

बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक प्रस्तावित करताना रु. १०० कोटी रक्कमेच्या अपेक्षित खर्चास नगरविकास विभागाच्या दिनांक २० फेब्रुवारी २०१९ च्या शासन निर्णयाद्वारे प्रशासकीय मान्यता प्रदान झालेली होती व दिनांक १६ मार्च २०२१ च्या शासन निर्णयाद्वारे रु ४०० कोटी रक्कमेस सुधारित प्रशासकीय मंजुरी प्रदान झालेली आहे. तसेच प्राधिकरणाच्या १५१ व्या बैठकीत दिनांक १६ नोव्हेंबर २०२१ रोजी रु. ४०० कोटीस प्रशासकीय मान्यता देण्यात आली.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
149,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा