26 C
Mumbai
Sunday, August 7, 2022
घरराजकारणउस्मानाबादच्या नामकरणावरून राष्ट्रवादीच्या ४० पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

उस्मानाबादच्या नामकरणावरून राष्ट्रवादीच्या ४० पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

Related

उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यायच्या आधी शहरांचे नामांतर केले. औरंगाबादचे संभाजी नगर आणि उस्मानाबादचे नाव धाराशिव नगर असे केले. औरंगाबादच्या नामांतरावरून काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला. त्यांनतर उस्मानाबादच्या नामकरणामुळे राष्ट्रवादीच्या ४० पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामा दिला आहे.

ज्या दिवशी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. त्यापूर्वी मंत्रिमंडळाच्या बैठकीत औरंगाबादचे संभाजी नगर आणि उस्मानाबादचे नाव धाराशिव नगर असे करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्याचबरोबर नवी मुंबई विमानतळाचे नावही बदलून दि. बा.पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ करण्यात येणार आहे. मात्र औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतरानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला आहे.

राष्ट्रवादीच्या ४० पदाधिकाऱ्यांनी त्यांचे सामूहिक राजीनामे उस्मानाबादचे नाव धाराशिव केल्याने दिले आहेत. राष्ट्रवादीच्या ४० पदाधिकाऱ्यांनी जयंत पाटील यांना पत्र लिहून राजीनामे दिले आहेत. अल्पसंख्यांक प्रदेश सचिव मसुद शेख, पाच नगरसेवक, जिल्हा उपाध्यक्ष, शहराध्यक्ष यांनी दिले सामूहिक राजीनामे दिले आहेत.

हे ही वाचा:

सिलेंडरच्या दरात आजपासून मोठी कपात

१२ जुलैला पंतप्रधान मोदी झारखंड दौऱ्यावर

शिंदे सरकारचा मोठा निर्णय; मेट्रो कारशेड आरेतच!

संजय राऊत आज ईडीसमोर हजर होणार

यापूर्वी नामांतरानंतर लगेच औरंगाबाद काँग्रेसचे शहराध्यक्ष मोहंमद हिशाम उस्मानी यांनी राजीनामा दिला आहे. त्यांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसच्या मुस्लिम पदाधिकाऱ्यांनीही धडाधड राजीनामे दिले. औरंगाबाद शहराचे नाव संभाजीनगर झाल्यामुळे हिशाम उस्मानी यांनी राजीनामा दिल्यानंतर आतापर्यंत काँग्रेसच्या २०० मुस्लिम पदाधिकाऱ्यांनीही राजीनामे दिले आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,919चाहतेआवड दर्शवा
1,922अनुयायीअनुकरण करा
14,900सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा