37 C
Mumbai
Tuesday, April 16, 2024
घरराजकारणसर्वाधिक निवडणूक रोखे देणाऱ्या कंपनीकडून ५०९ कोटी द्रमुक पक्षाला

सर्वाधिक निवडणूक रोखे देणाऱ्या कंपनीकडून ५०९ कोटी द्रमुक पक्षाला

Google News Follow

Related

सर्वाधिक निवडणूक रोख्यांची खरेदी करणाऱ्या फ्युचर गेमिंग अँड हॉटेल सर्व्हिसेस या कंपनीने ५०९ कोटी रुपयांची देणगी एमके स्टॅलिन यांच्या द्रमुक पक्षाला दिल्याचे नवीन माहितीनुसार उघड झाले आहे. ही कंपनी सँटिआगो मार्टिन यांची आहे.
एसबीआयने दिलेला निवडणूक रोख्यांचा तपशील निवडणूक आयोगाने त्यांच्या वेबसाइटवर जाहीर केला आहे. द्रमुक पक्षाला एकूण ६५६ कोटी ५० लाख रुपये निवडणूक रोख्यांच्या रूपात मिळाले. त्यातील ७७ टक्के म्हणजेच ५०९ कोटी रुपये एकट्या लॉटरी किंग सँटिआगो मार्टिन यांच्या फ्युचर गेमिंग कंपनीकडून मिळाले आहेत.

फ्युचर गेमिंग कंपनी ही सर्वाधिक निवडणूक रोखे खरेदी करणारी कंपनी ठरली आहे. त्यांनी केलेलेल्या एकूण एक हजार ३६८ कोटी निवडणूक रोख्यांपैकी ३७ टक्के देणगी तमिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांच्या पक्षाला मिळाली आहे. द्रमुकला देणगी देणाऱ्यांमध्ये मेघा इंजिनीअरिंग (१०५ कोटी), इंडिया सिमेंट्स (१४कोटी) आणि सन टीव्ही (१०० कोटी) या कंपन्यांचाही समावेश आहे.

पक्षाला देणगी देणाऱ्यांची नावे उघड करणाऱ्या हाताच्या बोटावर मोजता येणाऱ्या पक्षांमध्ये द्रमुकचा समावेश आहे. तर, भाजप, काँग्रेस, तृणमूल आणि काँग्रेसने याबाबतचा तपशील निवडणूक आयोगाला सादर केलेला नाही. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर, निवडणूक आयोगाने हा तपशील सार्वजनिक केला आहे.

हे ही वाचा:

रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा १६ वर्षांचा दुष्काळ संपला!

रशियाच्या राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत ८८ टक्के मते मिळवून पुतिन विजयी

उद्धव ठाकरेंना गुडबाय; आमदार आमशा पाडवी एकनाथ शिंदेकडे!

यूट्यूबर एल्विश यादवला नोएडा पोलिसांनी केली अटक!

सन २०१८पासून निवडणूक रोख्यांची योजना आणल्यानंतर सर्वाधिक देणगी मिळणाऱ्या पक्षांमध्ये भाजप सहा हजार ९८६ कोटी ५० लाखांची देणगी मिळून यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. तर, ममता बॅनर्जी यांचा तृणमूल काँग्रेस एक हजार ३९७ कोटी देणगीसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यामागोमाग काँग्रेस (एक हजार ३३४ कोटी) आणि भारत राष्ट्र समिती (एक हजार ३२२ कोटी) या पक्षांचा क्रमांक लागतो.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
147,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा