लोकसभा निवडणुकीपूर्वी शिवसेना उबाठा गटाला मोठा धक्का बसला आहे.आमदार आमश्या पाडवी यांनी ठाकरेंची साथ सोडत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची माळ हाती धरली आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थिती आमदार आमश्या पाडवी यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे.तसेच शिवसेना उबाठा गटाचे कल्याणचे जिल्हाप्रमुख चंद्रकांत बोडारे यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे.
लोकसभेच्या तारखा जाहीर झाल्यानंतर राज्यातील पक्ष तयारीला लागले आहेत.दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागलेल्या उद्धव ठाकरेंना मोठा झटका बसला आहे.कल्याणचे जिल्हाप्रमुख चंद्रकांत बोडारे यांनी शनिवारी (१६ मार्च) शिंदे यांच्या शिवसेनेत आपली पत्नी शितल बोडारे तसेच इतर कार्यकर्त्यांसोबत वर्षा बंगल्यावर प्रवेश केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश करण्यात आला.यानंतर आज(१७ मार्च) आमदार आमश्या पाडवी यांनी आपल्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह ठाकरेंच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र करत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे.
हे ही वाचा:
शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही, त्यापेक्षा माझं दुकान बंद करेन!
गुजरातमध्ये वसतिगृहाच्या परिसरात नमाज पढणाऱ्या परदेशी विद्यार्थ्यांवर हल्ला!
मुख्यमंत्री केजरीवाल यांना नवीन प्रकरणात ईडीकडून समन्स!
कोलकाता: तोतया लष्कर अधिकारी पोलिसांच्या ताब्यात!
दरम्यान, आमश्या पाडवी हे नंदुरबार जिल्ह्यातील दुर्गम भागातील शिवसेनेचा महत्त्वाचा चेहरा आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून ते शिवसेनेत काम करत आहेत.गेल्या अनेक दिवसांपासून आमश्या पाडवी शिंदेंच्या शिवसेनेच्या संपर्कात असल्याची माहिती आहे.अखेर त्यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.आमश्या पाडवी यांचा शिंदे शिवसेनेत प्रवेश झाल्याने उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.