37 C
Mumbai
Tuesday, April 16, 2024
घरविशेषकोलकाता: तोतया लष्कर अधिकारी पोलिसांच्या ताब्यात!

कोलकाता: तोतया लष्कर अधिकारी पोलिसांच्या ताब्यात!

राष्ट्रपतींच्या सुरक्षेत काम करत असल्याची केली बतावणी

Google News Follow

Related

कोलकाता येथील लष्कराच्या मुख्यालयात प्रवेश करणाऱ्या एका तोतया वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्याला अटक करण्यात आली आहे.मुख्यालयात प्रवेश करण्यासाठी आवश्यक असलेली ओळखपत्रे देण्यास सांगितल्यावर सुरक्षा कर्मचाऱ्यांना त्याच्यावर संशय आला अन त्याला ताब्यात घेण्यात आले.त्याची चौकशी केली असता त्याने यापूर्वीही अनेक गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले.तसेच फोर्ट विल्यमला जाण्यासाठी त्या व्यक्तीने बीएमडब्ल्यू कार भाड्याने घेतल्याचे दिखील उघड झाले.

भारतीय लष्कराचे पूर्व कमांड मुख्यालय फोर्ट विल्यम कोलकाता येथे आहे. मीडिया रिपोर्टनुसार, बोराडा सुधीर असे अटक करण्यात आलेल्या तोतया लष्करी अधिकाऱ्याचे नाव असून तो विशाखापट्टणम, आंध्र प्रदेशचा रहिवासी आहे.१६ फेब्रुवारीला बोर्डा सुधीर हा काळ्या बीएमडब्ल्यू कारमधून फोर्ट विल्यमच्या गेटवर पोहोचला. गाडीसोबत एक चालक देखील होता.गेटवर आल्यानंतर सुधीरने मोबाईलवर आपले ओळखपत्र दाखवले.

हे ही वाचा:

ईडी अधिकाऱ्यांवरील हल्ल्याप्रकरणी शाहजहान शेखच्या भावाला अटक

पंतप्रधानांनी ईडीला दिली शाबासकी, भ्रष्टाचाराविरोधातील कारवाईबद्दल कौतुक

हत्या झालेला पंजाबी गायक सिद्धू मूसेवालाच्या आईने लहान मुलाला दिला जन्म!

मथुरेत लव्ह जिहाद; हिंदू असल्याचे भासवून हिंदू मुलीला प्रेमपाशात ओढले; गर्भवती झाल्यानंतर सोडले!

ओळखपत्रानुसार, त्याची ओळख पाचव्या गोरखा रायफल युनिटचे मेजर एमएस चौहान अशी होती.एंट्री गेटवर उपस्थित असलेला लष्करी हवालदाराने त्याला त्याचा तपशील एंट्री रजिस्टरमध्ये लिहायला सांगितले.यावर त्याने ओळखपत्राचा संदर्भ देत रजिस्टरमध्ये नोंद करण्याचे टाळाटाळ केली.त्याच्या अशा वागण्यावर तिथे उपस्थित असलेल्या लष्करी जवानाला त्याच्यावर संशय आला.त्यानंतर त्याला पकडून चौकशी केली असता संपूर्ण सत्य बाहेर आले.

तपासादरम्यान, बोर्डा सुधीर हा आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथील रहिवासी असल्याचे समोर आले आहे.चौकशी दरम्यान त्याच्यावर फसवणुकीचे अनेक गुन्हे दाखल झाल्याचे समोर आले.आयपीसीच्या कलम- ४२० अंतर्गत गेल्या सप्टेंबरमध्ये ओडिशातील बालगृहात त्याला दाखल करण्यात आले होते. या वर्षी फेब्रुवारीमध्ये त्याची सुटका झाली.सुटकेनंतर तो कटक येथील हॉटेल प्राईडमध्ये थांबला. येथे त्याने ६,३९३ रुपयांची फसवणूक करून तो पळून गेला. त्यानंतर १४ मार्च रोजी विना तिकीट प्रवास करून तो हावडा रेल्वे स्थानकावर आला. तेथून त्याने कोलकाता विमानतळावर टॅक्सी केली.विमानतळाकडे जाताना त्याने पंचतारांकित हॉटेल जेडब्ल्यू मॅरियटला कॉल केला आणि त्याला घेण्यासाठी कॅब पाठवण्यास सांगितले.

यानंतर त्याने हॉटेलमधूनच काळ्या रंगाची बीएमडब्ल्यू कार भाड्याने घेतली आणि ड्रायव्हरला सांगितले की, तो आर्मी ऑफिसर आहे. राष्ट्रपतींच्या सुरक्षेत काम करतो, असे त्याने सांगितले. कॅब चालकाचाही त्याच्यावर विश्वास बसला. यानंतर तो फोर्ट विल्यमला पोहोचला अन तिथे त्याचे वास्तव समोर आले.दरम्यान, तोतया लष्करी अधिकारी सुधीरला पोलिसांनी अटक केली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
147,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा