हत्या झालेला पंजाबी गायक सिद्धू मूसवाला यांच्या घरात पुन्हा एकदा पाळणा हलला असून कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. सिद्धू मूसवालाची आई चरण कौर यांनी लहान मुलाला जन्म दिला आहे.मुसावालाचे वडील बलकौर सिंह यांनी स्वतः आपल्या लहान मुलाचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करताना ही माहिती दिली.
बलकौर सिंह यांनी ट्विटकरत आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, ‘शुभदीपवर प्रेम करणाऱ्या लाखो जीवांच्या आशीर्वादाने, अनंत देवाने शुभच्या धाकट्या भावाला आमच्या पदरात टाकले आहे.देवाच्या आशीर्वादाने कुटुंब निरोगी आहे आणि सर्व हितचिंतकांच्या अपार प्रेमाबद्दल मी आभारी आहे, असे बलकौर सिंह यांनी आपल्या पोस्ट मध्ये म्हटले आहे.दरम्यान, सिद्धू मूसवाला यांचे खरे नाव शुभदीप सिंग सिद्धू होते.
हे ही वाचा:
मथुरेत लव्ह जिहाद; हिंदू असल्याचे भासवून हिंदू मुलीला प्रेमपाशात ओढले; गर्भवती झाल्यानंतर सोडले!
आयपीएल २०२४चा संपूर्ण हंगाम भारतातच!
जमीनदोस्त केलेल्या मशिदीच्या जागी नमाज अदा करण्यास उच्च न्यायालयाने नाकारली परवानगी!
राष्ट्रीय स्वयंसेवक संलग्न सेवा भारती ट्रस्टवर ख्रिश्चन समुदायाच्या निर्मूलनाचा आरोप!
सिद्धू मूसवाला याच्या घरी त्याच्या लहान भावाचा भावाच्या जन्माची बातमी समोर येताच मूसवालाच्या चाहत्यांमध्ये आनंदाची लाट उसळली आहे.आतापर्यंत सिद्धूच्या वडिलांच्या पोस्टला सुमारे २ लाख लाईक्स आणि ३५०० हून अधिक कमेंट्स मिळाल्या आहेत.
दरम्यान, २०२२ मध्ये प्रसिद्ध पंजाबी गायक मूसवाला यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. तो त्याच्या आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. अशा परिस्थितीत कुटुंबाच्या वारसाच्या हितासाठी त्याच्या पालकांनी आयव्हीएफ तंत्राद्वारे गर्भधारणा करण्याचा निर्णय घेतला होता.