27 C
Mumbai
Saturday, October 5, 2024
घरराजकारणराज्यांची कामगिरी आणि भाजपचे यश

राज्यांची कामगिरी आणि भाजपचे यश

उत्तर प्रदेश, झारखंड आणि आसाममध्ये भाजप किमान ७५ टक्के जागा जिंकू शकते.

Google News Follow

Related

प्रत्येक निवडणुकीत पक्षाला मिळणाऱ्या मतटक्क्यात वाढ झाली की नाही, त्यावर त्या पक्षाची लोकप्रियता ठरत असते. मात्र भारतासारख्या देशात मतटक्क्यातील वाढ ही जागा वाढवण्यात रूपांतरित होत नाही. त्यामुळे भाजपची प्रादेशिक कामगिरी कशी आहे, त्याचा विचार करणे क्रमप्राप्त आहे.

५८ मतदारसंघ असलेल्या नऊ राज्यांत भाजपला विरोधकच नाही

गुजरात, हरयाणा, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, त्रिपुरा, अरुणाचल प्रदेश आणि दिल्ली, चंदिगड व दमण आणि दीव या राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांत लोकसभेचे एकूण ५८ मतदारसंघ आहेत. सन २०१४ ते २०१९ या दोन निवडणुकांदरम्यान दमण आणि दिव मतदारसंघाचा अपवाद वगळता सर्व मतदारसंघांमधील भाजपच्या मतटक्क्यात वाढ झाली आहे. सन २०१९मध्ये या राज्यांचे एकूण मतांचे प्रमाण १०.१५ टक्के होते. मात्र या निवडणुकीत भाजपला मिळालेल्या मतांपैकी तब्बल १६.४ टक्के मते या राज्यांतून मिळाली होती. त्यामुळे येथे मतटक्का वाढला तरी, त्याचा लोकसभा निवडणुकीच्या निकालात काहीही फरक पडला नाही, कारण या राज्यांत जिंकण्यासारखे काहीही उरलेले नाही.

 ८२ मतदारसंघ असेलल्या तीन राज्यांत किती जागा वाढतील

ही राज्ये अशी आहेत, जेथील किमान ९० टक्के जागा भाजप जिंकते. मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये भाजपने ५४पैकी ५२ जागा जिंकल्या होत्या. कर्नाटकमध्ये २८पैकी २५ जागा जिंकल्या होत्या. तर, एका मतदारसंघात भाजपने अपक्ष उमदेवाराला पाठिंबा दिला होता. कर्नाटकमध्ये यंदा भाजप सन २०१९च्या तुलनेत कमी जागा लढवणार आहे. यंदा भाजपची जनता दल (धर्मनिरपेक्ष)पक्षाशी आघाडी झाल्यामुळे भलेही भाजपला सहज विजय मिळाला, तरी या राज्यांतून भाजपच्या दोन ते तीनपेक्षा जास्त जागा वाढणार नाहीत.

उत्तर प्रदेश, झारखंड आणि आसाममध्ये काय होईल

उत्तर प्रदेश, झारखंड आणि आसाममध्ये भाजप किमान ७५ टक्के जागा जिंकू शकते. उत्तर प्रदेशात भाजपने ८०पैकी ६२ जागा जिंकल्या होत्या (सन २०१४मध्ये भाजपने ७१ जागा जिंकल्या होत्या). भाजपच्या मतटक्क्यात वाढ होऊनही त्यांच्या जागांमध्ये घट झाली होती. आताही उत्तर प्रदेशात भाजप सन २०१९च्या तुलनेत कमी जागा लढवणार आहे. येथे राष्ट्रीय लोक दल एनडीएमध्ये सहभागी झाला आहे. जर, राष्ट्रीय लोक दल आणि अपना दल पक्षांनी प्रत्येकी दोन जागा लढवल्या तर, भाजपला येथे ७६ जागांवर उभे राहावे लागेल. म्हणजेच उत्तर प्रदेश राज्यातून भाजपला कमाल १४ मतदारसंघ अधिक मिळवण्याची संधी आहे. त्याचप्रमाणे छत्तीसगढ आणि झारखंड (भाजपने सन २०१९मध्ये सर्व १४ मतदारसंघांवर उमेदवार दिले नव्हते) राज्यांतील सर्व मतदारसंघांत भाजपने आपला उमदेवार दिल्यास आणखी केवळ पाच मतदारसंघांत वाढ होऊ शकते. आसाममध्ये भाजपने १४पैकी १० जागा लढवल्या होत्या, त्यातील नऊ जागांवर भाजपचा विजय झाला होता. आघाडी अशीच कायम राहिल्यास भाजपची फारतर आणखी एक जागा वाढू शकते.

एनडीएची सत्ता असलेली, मात्र सन २०१९मध्ये भाजप प्रमुख पक्ष नसलेली राज्ये

महाराष्ट्रात आणि बिहारमध्ये अनुक्रमे ४८ व ४० मतदारसंघ आहेत. सन २०१९मध्ये भाजपने महाराष्ट्रात २५ जागा लढवल्या होत्या व त्यातील २३ जागांवर तर बिहारमधील सर्व १७ जागांवर विजय मिळवला होता. मात्र यातील जवळपास अर्धे मतदारसंघ एनडीए आघाडीत सहभागी झाले होते. त्यामुळे येथे एनडीएने निर्विवाद विजय मिळवला तरी भाजप येथे किती जागा लढवते, यावर भाजपला मिळणाऱ्या एकूण जागा अवलंबून आहेत. महाराष्ट्रात भाजप किमान ३० जागा लढवू शकते, अशी चर्चा सुरू आहे. मात्र अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. भाजपने २०१९मध्ये मिळवलेल्या एकूण ३०३ जागांपैकी २६६ जागा या एक ते चार श्रेणींतील राज्यांमधील होत्या. त्यामुळे येथे आघाडीमध्ये फारसा काही बदल न झाल्यास भाजपला अतिरिक्त २५पेक्षा जास्त जागा मिळण्याची शक्यता कमी आहे.

सन २०१९मध्ये भाजप दुसऱ्या क्रमांकावर राहिलेली राज्ये

ही राज्ये आहेत पश्चिम बंगाल आणि ओडिशा. पश्चिम बंगालमध्ये ४२ मतदारसंघ आहेत तर, ओडिशामध्ये २१. सन २०१९च्या निवडणुकीत भाजपने पश्चिम बंगालमध्ये १८ जागा जिंकल्या होत्या तर, ओडिशामध्ये आठ. सन २०१४च्या तुलनेत त्या वर्षी मतटक्क्यांतही वाढ झाली होती. यंदाच्या निवडणुकीत भाजपच्या मतटक्क्यांत कमी वाढ जरी झाली, तरी या दोन राज्यांत भाजपला ३७ जागा मिळू शकतील, असा अंदाज आहे. जर भाजपने ओडिशात बिजू जनता दलाशी आघाडी केल्यास भाजपचे राजकीय यश मर्यादित राहण्याची शक्यता आहे.

हे ही वाचा:

मथुरेत लव्ह जिहाद; हिंदू असल्याचे भासवून हिंदू मुलीला प्रेमपाशात ओढले; गर्भवती झाल्यानंतर सोडले!

ईडी अधिकाऱ्यांवरील हल्ल्याप्रकरणी शाहजहान शेखच्या भावाला अटक

आरएसएसवर ख्रिश्चन समुदायाच्या निर्मूलनाचा बदनामीकारक आरोप ! दंड भरावा लागला

महाराष्ट्रात पाच टप्प्यात होणार मतदान

दक्षिणेचे आव्हान

सन २०१९च्या निवडणुकीत तमिळनाडू, आंध्र प्रदेश, केरळमध्ये भाजप एकही जागा जिंकू शकली नव्हती. तर, तेलंगणात भाजपला चार जागा मिळवता आल्या होत्या. या चारही राज्यांत लोकसभेचे १०१ मतदारसंघ आहेत. आंध्रप्रदेशमध्ये भाजपने तेलुगू देसम पक्षाशी आघाडी केली असून अन्य तीन राज्यांत भाजप एकट्याने मैदानात उतरणार आहे. मात्र या तिन्ही राज्यांत भाजप पहिल्या दोन क्रमांकांचा पक्ष नाही. तमिळनाडूमध्ये एआयएडीएमकेच्या साथीने लाभ होण्याची शक्यता आहे. भाजपने इथे काही चमत्कार केला नाही तर, सन २०२४ निवडणुकीतील भाजपपुढील हे सर्वांत कठीण आव्हान असेल.
एकूण ५४३ लोकसभा मतदारसंघांपैकी श्रेणी १ ते ६ मध्ये राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांत ५११ जागा आहेत.

संमिश्र यश

या श्रेणीत पंजाब (१३), मणिपूर, मेघालय आणि गोवा (प्रत्येकी दोन), मिझोरम, नागालँड, सिक्कीम (प्रत्येकी एक) आणि जम्मू व काश्मीर (५), पुडुचेरी, लडाख, अंदमान व निकोबार, दादरा आणि नगरहवेली, लक्ष्यद्वीप (प्रत्येकी एक) या राज्यांचा समावेश आहे, भाजपने येथील ३२ मतदारसंघांपैकी सात जागांवर विजय मिळवला होता. या जागांमध्ये थोडीफार जरी वाढ झाली तरी भाजपला मोठा फायदा होऊ शकतो.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
180,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा