30 C
Mumbai
Thursday, April 18, 2024
घरराजकारणमहाराष्ट्रात पाच टप्प्यात होणार मतदान

महाराष्ट्रात पाच टप्प्यात होणार मतदान

मुंबईतील सहाही मतदारसंघात २० मे रोजी मतदान

Google News Follow

Related

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी आज निवडणूक प्रक्रियेची घोषणा केली आहे. देशात एकूण सात टप्प्यांमध्ये या निवडणुका पार पडणार असून महाराष्ट्रात पाच टप्प्यांमध्ये या निवडणुका होणार आहेत.

पहिल्या टप्प्यात १९ एप्रिल रोजी मतदान होईल. त्यात रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर आणि चंद्रपूर या लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे. दुसरा टप्प्यात २६ एप्रिल रोजी मतदान होणार असून त्यात बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ- वाशिम हिंगोली, नांदेड आणि परभणी या मतदारसंघांचा समावेश आहे. तिसऱ्या टप्प्यात ७ मे रोजी मतदान होणार असून त्यात रायगड, बारामती, धाराशिव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि हातकणंगले या लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे.

हे ही वाचा..

राज्य पोलीस दलात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करणार

गायिका अनुराधा पौडवाल यांचा भाजपा प्रवेश

‘माझ्या प्रिय कुटुंबातील सदस्य’ म्हणत नरेंद्र मोदींनी १४० कोटी भारतीयांना उद्देशून लिहिलं पत्र

षटक संपल्यानंतर ६० सेकंदांच्या आत पुढील षटकाला सुरुवात न केल्यास बसणार दंड

चौथ्या टप्प्यात १३ मे रोजी मतदान होणार असून त्यामध्ये नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरूर, अहमदनगर, शिर्डी आणि बीड या लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे. पाचव्या टप्प्यात २० मे रोजी मतदान होणार असून त्यामध्ये धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे आणि मुंबईतील सहाही मतदारसंघांचा यामध्ये समावेश आहे. अशा पाच टप्प्यांमध्ये महाराष्ट्रातील सर्व ४८ लोकसभा मतदार संघात मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
147,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा