26 C
Mumbai
Saturday, January 24, 2026
घरराजकारणकरुणा 'धनंजय मुंडें'च्या प्रेमकथेवर लवकरच सिनेमा

करुणा ‘धनंजय मुंडें’च्या प्रेमकथेवर लवकरच सिनेमा

Google News Follow

Related

बीडचे पालकमंत्री आणि राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या जोडीदार करुणा धनंजय मुंडे यांनी मोठी घोषणा केली आहे. आपली प्रेमकथा पुस्तक रुपात प्रकाशित करणार असल्याचं करुणा यांनी फेसबुक पोस्टमधून जाहीर केलं आहे. त्यामुळे करुणा यांच्या वैयक्तिक जीवनातील कुठल्या गोष्टी वाचायला मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

राष्ट्रवादीचे दिग्गज नेते धनंजय मुंडे यांच्यावर काही दिवसांपूर्वी एका तरुणीने लैंगिक अत्याचाराचे आरोप केले होते. त्यावर स्पष्टीकरण देताना आपलं खासगी आयुष्य उलगडून सांगण्याची वेळ धनंजय मुंडेंवर आली होती. त्यावरुन उडालेला धुरळा शांत होतो, न होतो, तोच पुन्हा एकदा या नात्यासंबंधी चर्चेला उधाण आले आहे.

माझ्या जीवनावर आधारित सत्य प्रेम जीवनगाथा लवकर प्रकाशन प्रकाशित होण्याच्या मार्गावर आहे. त्याचे प्रकाशन लवकर केले जाणार आहे, अशी माहिती करुणा धनंजय मुंडे यांच्या फेसबुक अकाऊण्टवरुन देण्यात आली आहे.

करुणा यांच्या बहिणीने धनंजय मुंडे यांच्याविरुद्ध केलेली तक्रार मागे घेतल्यानंतर हे सगळे प्रकरण थांबले, असे वाटत असतानाच पुन्हा एकदा आता करुणा यांनी आपण पुस्तक प्रकाशित करणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे आता या पुस्तकामध्ये नेमकी कोणती माहिती असणार याचीच चर्चा सध्या पाहायला मिळत आहे.

गेली २५ वर्षे आपण घराबाहेर पडलो नाही. पण गेल्या २ महिन्यांपासून घराबाहेर पडून बोलायला सुरुवात केली आहे. माझ्या वैयक्तिक आयुष्यात घडलेल्या घडामोडींविषयी केस असल्यानं कोर्टानं मला बोलण्यास मनाई केली आहे. मात्र, जेव्हा वेळ येईल तेव्हा सगळ्या गोष्टी पुराव्यासह मांडेन, असा इशारा करुणा यांनी याआधीच दिला होता.

हे ही वाचा:

नव्या कोविड रुग्णांचा आकडा ३ लाख ५० हजारापेक्षा कमी

अरबी समुद्रात वादळाची निर्मिीती; महाराष्ट्रात सतर्कतेचा इशारा

अक्षय्य तृतीयेच्या मोदींनी दिल्या शुभेच्छा

भाजपाच्या प्रभावाने करदात्यांचे कोट्यवधी रुपये वाचले

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांची करुणा शर्मा उर्फ करुणा धनंजय मुंडे यांनी भेट घेतली होती. त्यानंतर करुणा यांनी आपण समाजसेविका आहोत. पुढे राजकारणातही येणार, असं सांगितलं होतं. इतकंच नाही तर आपल्याला आमदारकीची निवडणूक लढवायची असल्याचा इशाराही करुणा यांनी दिला होता

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
288,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा