28.3 C
Mumbai
Sunday, August 2, 2026
घरराजकारणअभिजीत दिपकेची प्रकृती पुन्हा बिघडली

अभिजीत दिपकेची प्रकृती पुन्हा बिघडली

डॉक्टरांचा पूर्ण विश्रांतीचा सल्ला

Google News Follow

Related

कॉकरोच जनता पक्ष (CJP) चे संस्थापक अभिजीत दिपकेची प्रकृती शनिवारी पुन्हा एकदा बिघडली असून डॉक्टरांनी त्यांना पूर्ण विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. छत्रपती संभाजीनगर येथील त्यांच्या निवासस्थानी नागरिक आणि समर्थकांची भेट घेत असताना त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले. सुरुवातीला थकवा आणि अशक्तपणा जाणवत असतानाच त्याला उलट्यांचा त्रास सुरू झाला. त्यामुळे नियोजित भेटी रद्द करून ते तातडीने घरी परतले. त्याच्या प्रकृतीबाबत माहिती मिळताच कुटुंबीयांनी डॉक्टरांना घरी बोलावून उपचार सुरू केले.

तपासणीदरम्यान डॉक्टरांनी त्याचा रक्तदाब १००/६० इतका खाली आल्याचे निदर्शनास आणले. त्याचबरोबर सकाळपासून सतत मळमळ, उलट्या आणि जुलाबाचा त्रास होत असल्याचेही स्पष्ट झाले. शरीरात पाण्याची कमतरता जाणवत असल्याने त्यांना सलाईनद्वारे द्रवपदार्थ देण्यात आले. सध्या त्यांना ताप नसला तरी प्रकृती पूर्णपणे स्थिर होईपर्यंत घराबाहेर न पडण्याचा आणि संपूर्ण विश्रांती घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.
हे ही वाचा:
तरुणांनो, स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे !

स्पेनमध्ये ६० हजार निर्वासितांची अभूतपूर्व घुसखोरी

जादुमणी सिंहचे सुवर्ण हुकले; रौप्यपदकावर समाधान

सोमनच्या सुवर्ण फेकीला शुभमच्या रौप्याची साथ

दिपकेवर उपचार करणाऱ्या डॉ. विशाल लहाने यांनी सांगितले की, सध्या प्राथमिक उपचार सुरू असून औषधोपचारांना प्रतिसाद कसा मिळतो यावर पुढील उपचारपद्धती ठरणार आहे. प्रकृतीत अपेक्षित सुधारणा न झाल्यास रक्त तपासणीसह इतर आवश्यक वैद्यकीय चाचण्या करण्यात येतील. कोणताही शारीरिक किंवा मानसिक ताण घेऊ नये, असेही त्यांनी स्पष्ट केले.

विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वीच अभिजीत दिपके यानी स्वतःला टायफॉइड झाल्याची माहिती सार्वजनिकपणे दिली होती.  दरम्यान, त्याच्या प्रकृतीची माहिती समोर आल्यानंतर समर्थक आणि कार्यकर्त्यांनी त्याच्या लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार काही दिवस पूर्ण विश्रांती घेतल्यानंतरच तो सार्वजनिक कार्यक्रम किंवा भेटीगाठी पुन्हा सुरू करतील, अशी माहिती त्याच्या निकटवर्तीयांकडून देण्यात आली आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
325,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा