29.4 C
Mumbai
Wednesday, October 21, 2026
घरराजकारणअल्प प्रतिसादामुळे कॉक्रोच आंदोलन दिवाळीनंतर

अल्प प्रतिसादामुळे कॉक्रोच आंदोलन दिवाळीनंतर

अभिजीत दिपकेचे कार्यकर्त्यांना भावनिक आवाहन

Google News Follow

कॉक्रोच जनता पार्टीच्या गेल्या काही दिवसातील आंदोलनाला मिळणारा अल्प प्रतिसाद, सर्वसामान्यांकडून व्यक्त होणारा संताप, ऐन सणासुदीच्या दिवसांत व्यापाऱ्यांना होत असलेला त्रास या पार्श्वभूमीवर कॉक्रोच पार्टीच्या आंदोलनावर टीका होत होती. आता ‘कॉक्रोच जनता पार्टी’चा संस्थापक अभिजीत दिपके याने दिवाळीपर्यंत आंदोलनाला ब्रेक दिला आहे. आपल्या कुटुंबीयांसोबत सण साजरा करा, असे त्याने कार्यकर्त्यांना सांगितले. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनामुळे कार्यकर्त्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे सणाच्या काळात कुटुंबीयांना वेळ देणे आणि मानसिक शांतता मिळवण्यासाठी आंदोलनाला ब्रेक देण्याचे कॉक्रोच जनता पार्टीने ठरवले आहे. मात्र, आंदोलन स्थगित ठेवण्याचा निर्णय म्हणजे संघर्षातून माघार नसून कार्यकर्त्यांना दिलेला हा एक भावनिक विराम असल्याचे त्याने म्हटले आहे.

आंदोलनातील सहकारी आशुतोष रांका आणि सौरव दास हे तुरुंगात असल्याने अभिजीत दिपकेने त्यांच्या परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त केली. या दोघांना आपल्या कुटुंबाचा भाग मानत त्यांनी कार्यकर्त्यांना संयम राखण्याचे आवाहन केले. मतदारयादीच्या विशेष सखोल पुनरावलोकनाच्या (SIR) विरोधात सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान आशुतोष रांका आणि सौरव दास यांना १३ ऑक्टोबर रोजी ताब्यात घेण्यात आले होते. आंदोलनस्थळी सुरक्षा अडथळे ओलांडल्याच्या आरोपावरून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली असून, त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. त्यांच्या अटकेमुळे आंदोलनकर्त्यांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. या परिस्थितीत कार्यकर्त्यांनी निराश न होता एकजूट कायम ठेवावी, असा संदेश दिपकेने दिला.
हे ही वाचा:
शिवा शर्मा मृत्यूप्रकरणातील फरार श्रद्धा दुबेला नागपुरात अटक

ब्रिटनमधील वेस्ट यॉर्कशायरमध्ये दसरा, बथुकम्मा उत्सवात ‘जिहादी’ व्यत्यय

इंजिनिअरिंग डिझाइनसाठी स्वस्त, वेगवान भारतीय एआय मॉडेल

ड्रग्सविरोधात लढताना प्राण गमावणाऱ्यांच्या कुटुंबीयांना अमित शहा भेटले
अभिजीत दिपकेने आंदोलनाची भूमिका स्पष्ट करताना द्वेषाऐवजी प्रेम, करुणा आणि अहिंसेचा मार्ग स्वीकारण्याचे आवाहन केले. विरोधकांविषयी मनात द्वेष न ठेवता महात्मा गांधींच्या विचारांनुसार शांततेच्या मार्गाने संघर्ष सुरू ठेवणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. आंदोलनात सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांनी आपल्या कुटुंबीयांच्या भावनांचाही विचार करावा आणि सणाच्या काळात त्यांच्यासोबत वेळ घालवावा, अशी त्यांची अपेक्षा आहे. दिवाळीपर्यंत आंदोलन थांबवण्याच्या या आवाहनामुळे आंदोलनाच्या पुढील रणनीतीबाबत चर्चा सुरू झाली असून, तुरुंगात असलेल्या सहकाऱ्यांच्या सुटकेचा आणि आंदोलनाच्या भविष्यातील दिशेचा प्रश्न महत्त्वाचा ठरणार आहे.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
339,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा