32 C
Mumbai
Thursday, October 22, 2026
घरराजकारणराणीनं डाव जिंकला...सोमेश्वर साखर कारखाना निवडणुकीत अजितदादा पॅनल २१-०

राणीनं डाव जिंकला…सोमेश्वर साखर कारखाना निवडणुकीत अजितदादा पॅनल २१-०

सुनेत्रा पवारांनी विजय केला अजितदादांना समर्पित

Google News Follow

बारामती तालुक्यातील प्रतिष्ठेच्या श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी जो विजयाचा विश्वास व्यक्त केला होता, तो खरा ठरला. या निवडणुकीदरम्यान पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना आम्ही २१-० अशी बाजी मारू असे सुनेत्रा पवार म्हणाल्या होत्या. अगदी तसात निकाल लागत त्यांच्या ‘श्री सोमेश्वर विकासपुरुष अजितदादा पवार पॅनेल’ने दणदणीत विजय मिळवला आहे. विरोधकांचे सर्व मनसुबे उधळून लावत सुनेत्रा पवारांच्या पॅनेलने २१ पैकी २१ जागा जिंकल्या.

रविवारी पार पडलेल्या ८४ टक्के मतदानानंतर सोमवारी मतमोजणी झाली. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि राष्ट्रवादीतून बंडखोरी केलेले पुरुषोत्तम जगताप या दोन्ही विरोधी पॅनेलचे पूर्णपणे पानिपत झाले.

कारखान्यावरील ऐतिहासिक विजयानंतर प्रतिक्रिया देताना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार अत्यंत भावूक झाल्या. त्या म्हणाल्या की, आदरणीय अजितदादांनी तब्बल ३४ वर्षे सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या विकासासाठी आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी आपले योगदान दिले. कारखान्याशी त्यांचे असलेले जिव्हाळ्याचे नाते आणि जपलेला सहकार वारसा यांची या विजयाच्या निमित्ताने आठवण होत आहे. हा विजय अजितदादांच्या कार्याला समर्पित आहे.”

हे ही वाचा:

दिवाळीनंतर युपीआय व्यवहारांवर शुल्क

जंतर मंतरमध्ये घुसलेल्या ‘कॉक्रोच’ना घेतले ताब्यात

प्रिय सूर्यकांत, राजीनामा द्या….काँग्रेसने पोस्ट केली डीलिट

‘दीपस्तंभ’ची त्या मुलींना साथ, ‘भारतीय स्त्री शक्ती’चा मदतीचा हात

या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने आणि राष्ट्रवादीतून बंडखोरी केलेले नेते पुरुषोत्तम जगताप यांनी स्वतंत्र पॅनेल उभे करून सुनेत्रा पवारांसमोर मोठे आव्हान उभे करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, सभासदांनी सुनेत्रा पवारांच्या पॅनेलच्या बाजूने एकतर्फी कौल दिला.

सुनेत्रा पवारांनी एक्सवर पोस्ट लिहित या विजयाबद्दल सभासदांचे आभार मानले आणि अजितदादांना हा विजय समर्पित करत असल्याची भावना व्यक्त केली. त्यांनी लिहिले की,  दादांनी रुजवलेला विश्वास, सभासदांनी दिलेला कौल… हा विजय समर्पित आदरणीय दादांच्या कार्याला! श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत (२०२६-३१) ‘श्री सोमेश्वर विकासपुरुष अजितदादा पवार पॅनेल’वर विश्वास दाखवून भरघोस विजय मिळवून दिल्याबद्दल सर्व सभासद मतदारांचे मनःपूर्वक आभार तसेच सर्व विजयी उमेदवारांचे अभिनंदन! तब्बल ३४ वर्षं आदरणीय अजितदादांनी सोमेश्वरच्या विकासासाठी काम केलं. कारखान्याशी त्यांचं असलेलं घट्ट नातं, सभासद शेतकऱ्यांसाठी पाहिलेली स्वप्नं आणि त्यांनी जपलेला सहकाराचा वारसा, याचाच हा विजय आहे.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
339,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा