27.9 C
Mumbai
Sunday, October 18, 2026
घरराजकारणजंतर मंतरमध्ये घुसलेल्या 'कॉक्रोच'ना घेतले ताब्यात

जंतर मंतरमध्ये घुसलेल्या ‘कॉक्रोच’ना घेतले ताब्यात

मनाई असतानाही केला प्रवेश

Google News Follow

कॉक्रोच जनता पार्टीचे नेते सौरव दास आणि आशुतोष रांका यांना मंगळवारी दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले. जंतरमंतर येथे प्रवेश करण्यासाठी त्यांनी गेटवरून उडी मारली होती. प्रशासनाने जंतरमंतर हे अधिकृत आंदोलनस्थळ म्हणून आता बंद केले आहे  या दोघांसोबत अजिंक्य शिंदे यालाही अन्य समर्थकांसह ताब्यात घेण्यात आले.

ताब्यात घेण्यापूर्वी रांकाने ‘एक्स’ (X) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक व्हिडिओ पोस्ट केला. या व्हिडिओमध्ये तो दास आणि कॉक्रोचचे अन्य समर्थक गेटवरून उडी मारून परिसरात प्रवेश करताना दिसत आहेत. या व्हिडिओला त्यांनी “जंतरमंतरपासून दूर राहा!” असे कॅप्शन दिले.

उपलब्ध माहितीनुसार, या गटाने आंदोलनस्थळाजवळील जनता दल (युनायटेड) अर्थात जेडीयूच्या कार्यालयाच्या परिसराच्या बाजूने जंतरमंतरमध्ये प्रवेश केला. त्यानंतर पोलिसांनी त्या परिसरात प्रवेश केलेल्या सर्वांना ताब्यात घेतले.

हे ही वाचा:

‘केईएम’ डीन ते औषध संशोधन शिवधनुष्य पेलल्याचे समाधान |

जयशंकर यांचा इशारा शेतकऱ्यांची कसोटी |

राहुल गांधीसह विरोधी नेत्यांनी केली ज्ञानेश कुमारांविरोधात याचिका

दुग्धालयात राहुल गांधींना हवाय खिमा पाव…

दासने ‘एक्स’वर (X) आणखी एक व्हिडिओ पोस्ट केला. या व्हिडिओमध्ये पोलीस कॉक्रोच समर्थकांना ताब्यात घेत असताना ते “इन्कलाब झिंदाबाद” आणि “भारत माता की जय” अशा घोषणा देताना दिसत आहेत. आपल्या पोस्टमध्ये दासने जंतरमंतर पुन्हा मिळवल्याचे जाहीर केले.

दासने आपल्या पोस्टमध्ये लिहिले, “जंतरमंतर पुन्हा मिळवले आहे! आम्ही जंतरमंतरमध्ये प्रवेश केला आहे आणि आता आम्हाला ताब्यात घेतले जात आहे! पण हा आपल्या सर्व तरुण पिढीसाठी एक संदेश आहे! आपण हे करू शकतो! ज्ञानू, तुझा खेळ आता संपला आहे, भावा!”

या घटनेच्या संदर्भात पोलीस एफआयआर (FIR) देखील दाखल करू शकतात. तथापि, एफआयआर दाखल करण्यात आला आहे की नाही, याबाबत तातडीने कोणतीही अधिकृत पुष्टी झालेली नव्हती.

दिल्ली पोलिसांनी जंतरमंतरला आंदोलन आणि निदर्शनांसाठीचे अधिकृत स्थळ म्हणून असलेला दर्जा रद्द केल्यानंतर एका दिवसाने ही धरपकड झाली. आंदोलनांसाठी तीन पर्यायी स्थळांचीही घोषणा करण्यात आली आहे.

या आदेशामुळे २८ एप्रिल २०२२ रोजी जारी करण्यात आलेल्या पूर्वीच्या स्थायी आदेशात अंशतः बदल करण्यात आला आहे.

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात एसआयआर (SIR) प्रक्रियेत कथित अनियमितता झाल्याच्या आरोपावरून शांततापूर्ण आंदोलन करण्याच्या परवानगीवरून कॉकरोच जनता पार्टी (CJP) आणि दिल्ली पोलीस यांच्यात सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला.

सोमवारी CJP चे नेते संसद मार्ग पोलीस ठाण्यातून बाहेर पडले. प्रस्तावित आंदोलनासाठी तारीख निश्चित करण्याची आणि परवानगी नाकारण्यामागील कारण स्पष्ट करण्याची मागणी त्यांनी पुन्हा केली.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
338,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा