अजित पवार बीडचे पालकमंत्री, धनंजय मुंडेंचा पत्ता कट

फडणवीस गडचिरोली तर एकनाथ शिंदे मुंबई व ठाण्याचे पालकमंत्री

अजित पवार बीडचे पालकमंत्री, धनंजय मुंडेंचा पत्ता कट
मंत्रिमंडळ जाहीर झाल्यानंतर प्रत्येक जिल्ह्याचे पालकमंत्री कोण याची चर्चा अनेक दिवस सुरू होती. अखेर शनिवारी पालकमंत्र्यांची यादी जाहीर करण्यात आली असून सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या बीड जिल्ह्याचे पालकमंत्रीपद राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख अजित पवार यांच्याकडे सोपविण्यात आले आहे. अर्थात, बीडचे पालकमंत्री म्हणून धनंजय मुंडे यांच्या नावावर फुली मारण्यात आली आहे.
बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येनंतर या जिल्ह्याचे पालकमंत्री मुंडे असू नये अशी मागणी पुढे येत होती. एवढेच नव्हे तर त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी सर्व स्तरातून होताना दिसते आहे. अशा परिस्थितीत हा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे. यावरून मुंडे यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागेल का असा प्रश्नही उपस्थित होऊ लागला आहे.
दरम्यान, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री राहणार असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुंबई शहर आणि ठाण्याचे पालकमंत्री असतील. बीड सोबतच अजित पवार यांच्याकडे पुण्याचं देखील पालकमंत्रिपद असणार आहे. आदिती तटकरे या रायगडच्या पालकमंत्री असणार आहेत. मुंबई उपनगरचे पालकमंत्रीपद आशिष शेलार, मंगलप्रभात लोढा यांच्याकडे सोपविण्यात आले आहे.
हे ही वाचा:
सैफ हल्ला प्रकरणी मध्य प्रदेश, छत्तीसगडमधून दोन संशयित ताब्यात
केजरीवालांच्या गाडीवर दगडफेक; तरुणांना गाडीने धडक दिल्याचा भाजपाचा आरोप
राजनाथ सिंह यांनी त्रिवेणीच्या संगमात घेतली डुबकी
जसप्रीत बुमराह चॅम्पियन्स ट्रॉफी खेळणार; मोहम्मद शामीलाही संघात स्थान
पंकजा मुंडे यांच्याकडे जालन्याचं पालकमंत्रिपद देण्यात आले आहे. गुलाबराव पाटील हे जळगावचे पालकमंत्री असणार आहेत. धुळ्याचं पालकमंत्रिपद जयकुमार रावल यांच्याकडे सोपवण्यात आलं आहे. नितेश राणे यांच्याकडे सिंधुदुर्गचे पालकमंत्रीपद देण्यात आले आहे.
वाशिमची जबाबदारी हसन मुश्रीफ यांना देण्यात आली आहे. संजय राठोड हे यवतमाळचे पालकमंत्री असणार आहेत. उदय सामंत हे रत्नागिरीचे पालकमंत्री असणार आहेत.

 

पालकमंत्र्यांची यादी 

  • गडचिरोली – देवेंद्र फडणवीस
  • नागपूर – चंद्रशेखर बावनकुळे
  • ठाणे – एकनाथ शिंदे
  • पुणे – अजित पवार
  • बीड – अजित पवार
  • सिंधुदुर्ग- नितेश राणे
  • अमरावती – चंद्रशेखर बावनकुळे
  • अहिल्यानगर – राधाकृष्ण विखे पाटील
  • वाशिम – हसन मुश्रीफ
  • सांगली – चंद्रकांत पाटील
  • सातारा -शंभुराजे देसाई
  • छत्रपती संभाजी नगर – संजय शिरसाट
  • जळगाव – गुलाबराव पाटील
  • यवतमाळ – संजय राठोड
  • कोल्हापूर – प्रकाश आबिटकर, सह पालकमंत्री माधुरी मिसाळ
  • अकोला – आकाश फुंडकर
  • भंडारा – संजय सावकारे
  • बुलढाणा – मकरंद जाधव
  • चंद्रपूर – अशोक ऊईके
  • धाराशीव – प्रताप सरनाईक
  • धुळे – जयकुमार रावल
  • गोंदिया – बाबासाहेब पाटील
  • हिंगोली – नरहरी झिरवळ
  • लातूर – शिवेंद्रसिंग भोसले
  • मुंबई शहर – एकनाथ शिंदे
  • मुंबई उपनगर -आशिष शेलार/ सह पालकमंत्री मंगलप्रभात लोढा
  • नांदेड – अतुल सावे
  • नंदुरबार – माणिकराव कोकाटे
  • नाशिक – गिरीष महाजन
  • पालघर – गणेश नाईक
  • परभणी – मेघना बोर्डीकर
  • रायगड – अदिती तटकरे
  • सिंधुदुर्ग- नितेश राणे
  • रत्नागिरी – उदय सामंत
  • सोलापूर – जयकुमार गोरे
  • वर्धा – पंकज भोयर
  • जालना – पंकजा मुंडे

 

Exit mobile version