आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी- २०२५ साठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयने भारतीय संघाची घोषणा केली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखाली १५ सदस्यीय भारतीय संघ जाहीर करण्यात आला आहे. संघाच्या उपकर्णधारपदी युवा खेळाडू शुभमन गिल याची वर्णी लागली आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडियममधील पत्रकार परिषदेतून बीसीसीआय निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांनी आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी- २०२५ साठी भारतीय संघाची घोषणा केली.
चॅम्पियन्स ट्रॉफीत एकूण 8 संघ सहभागी झाले आहेत. भारतीय संघ ‘ए’ गटात असून भारतासोबत बांगलादेश, पाकिस्तान आणि न्यूझीलंडचा समावेश आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या यजमानपदाचा मान पाकिस्तानकडे असून भारतीय संघाचे सामने मात्र सुरक्षिततेच्या कारणामुळे दुबईत होणार आहेत. यासाठी कोणकोणते खेळाडू संघात असणार याची उत्सुकता क्रिकेटप्रेमींना लागून राहिली होती. अखेर संघ जाहीर झाला असून कोणते १५ खेळाडू संघात असणार आहेत हे उघड झाले आहे.
काही दिवसांपूर्वी भारतीय संघाने टी- २० विश्वचषकावर रोहित शर्मा याच्या नेतृत्वाखाली नाव कोरले होते. यानंतर आता रोहित शर्माच्या नेतृत्वातचं भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी मैदानात उतरणार आहे. संघाच्या उपकर्णधार पदी शुभमन गिल याला संधी देण्यात आली आहे. तर, अनुभवी खेळाडू विराट कोहली याचाही संघात समावेश करण्यात आला आहे. यष्टीरक्षक म्हणून केएल राहुल हा पहिली पसंती असल्याच्या चर्चा होत्या त्यानुसार केएल राहुलची निवड करण्यात आली आहे. तर, ऋषभ पंतने पर्यायी यष्टीरक्षक म्हणून संघात स्थान मिळवलं आहे. सध्या चांगल्या कामगिरीने चमक दाखवत असलेला मुंबईकर खेळाडू श्रेयस अय्यर यालाही संघात स्थान मिळवण्यात यश आले आहे.
टी- २० विश्वचषक स्पर्धेत चमकदार कामगिरी करणारे अक्षर पटेल आणि हार्दिक पंड्या यांना संघात स्थान देण्यात आलेले आहे. वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शामी, अर्शदीप, यशस्वी जयस्वाल, रवींद्र जडेजा यांना संघात स्थान मिळाले आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीतून यशस्वी जयस्वाल याची पहिल्यांदाच एकदिवसीय संघात निवड करण्यात आली आहे. यशस्वीचा अतिरिक्त सलामीवीर फलंदाज म्हणून समावेश करण्यात आला आहे.
Indian Cricket Team for Champions Trophy: Rohit Sharma (C), Virat Kohli, S Gill (VC), S Iyer, KL Rahul, Hardik Pandya, Axar Patel, Washington Sundar, Kuldeep Yadav, Jasprit Bumrah, M Shami, Arshdeep, Y Jaiswal, R Pant and R Jadeja. pic.twitter.com/GBuEWg82rc
— ANI (@ANI) January 18, 2025
जसप्रीत बुमराहचा याला ऑस्ट्रेलियात दौऱ्यातील सिडनी कसोटीत पाठीला दुखापत झाली होती. त्यामुळे संघात त्याचा समावेश होणार की याकडे लक्ष होते. मात्र, निवड समिताने बुमराहचा समावेश केला आहे. बुमराह चॅम्पियन्स ट्रॉफीपर्यंत फिट होईल. मात्र, बुमराह खेळणार की नाही? हे त्याच्या फिटनेसवर अवलंबून असेल, असं अजित आगरकर यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं आहे.
भारतीय संघाचे स्पर्धेतील वेळापत्रक
- भारत विरुद्ध बांगलादेश: २० फेब्रुवारी, दुबई
- भारत विरुद्ध पाकिस्तान: २३ फेब्रुवारी, दुबई
- भारत विरुद्ध न्यूझीलंड: २ मार्च, दुबई
- पहिला उपांत्य सामना: ४ मार्च, दुबई
- दुसरा उपांत्य सामना: ५ मार्च, लाहोर
- अंतिम सामना, ९ मार्च, लाहोर, (भारत पात्र ठरल्यास दुबई)
- १० मार्च, अंतिम सामन्यासाठी राखीव दिवस
हे ही वाचा..
आरजी कर बलात्कार प्रकरणात संजय रॉय दोषी!
स्वामित्व योजनेंतर्गत ५० हजारांहून अधिक गावांमध्ये ६५ लाख मालमत्ता कार्ड्सचे वितरण
विदेशातील पुरोगाम्यांना महाकुंभाचा मुरडा!
गड किल्ल्यांवरील अतिक्रमण काढण्यासाठी, अतिक्रमणे रोखण्यासाठी जिल्हास्तरीय कमिटी
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारताचा संघ- रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंह, यशस्वी जयस्वाल, ऋषभ पंत आणि रवींद्र जडेजा.