भारतातील उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये जगातील सर्वात मोठ्या अशा आध्यात्मिक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. जगाच्या नजरा या महाकुंभ मेळ्याकडे असून विदेशी भाविकांनीही महाकुंभ मेळ्याच्या पावित्र्याची अनुभूती घेण्यासाठी हजेरी लावली आहे. जवळपास ४० करोड भाविक आणि जगातील सर्वात मोठा धार्मिक मेळा म्हणून अमेरिका ते टर्की, रशिया, चीन, इस्रायल, फ्रेंच, पाकिस्तानमधील सर्वचं लोक भारतातील महाकुंभ बद्दल बोलत आहेत.
महाकुंभ मेळ्यात सहभागी झालेले परदेशी नागरिक या मेळ्यातील आयोजनाचे, सोयीसुविधांचे आणि शिस्तीचे कौतुक करत असले तरी काही पाश्चिमात्य माध्यमांना भारताचे होत असलेले हे कौतुक फार रुचत नसल्याचे समोर आले आहे. महाकुंभचे नकारात्मक चित्र उभं करण्यात ते धन्यता मानताना दिसत आहेत. ‘बीबीसी’ने महाकुंभचे वार्तांकन करताना महाकुंभचे नकारात्मक चित्र उभे करण्यासाठी म्हणून आक्षेपार्ह भाषा वापरली. खरेतर एवढ्या मोठ्या मेळ्याचे आयोजन करणे यासाठी भारताकडे असलेल्या क्षमतेचे कौतुक करणे आणि यातून शिकणे याची संधी ‘बीबीसी’ला असताना त्यांनी त्यांच्या लेखात काही धक्काबुकी झाल्याच्या दाव्यांवर लक्ष केंद्रित करून त्याचे वार्तांकन करण्यात धन्यता मानली. अनेक लोक महाकुंभमध्ये देण्यात आलेल्या सोयीसुविधांबद्दल गुणगाण गात असताना बीबीसी मात्र या मुद्द्यांकडे दुर्लक्ष का करत आहे याचे आश्चर्य वाटत असल्याच्या भावना लोक व्यक्त करत आहेत.
पण, बीबीसीच्या प्रचारतंत्राचे अनेक उपस्थित भाविकांनी खंडन केले आहे. विदेशी भाविक म्हणतात की, महाकुंभच्या आयोजकांनी इथे एक संपूर्ण शहर निर्माण केलं आहे, ही बाब आश्चर्य व्यक्त करण्यासारखी आहे. करोडो लोकांसाठी करण्यात आलेली सुरक्षा व्यवस्था अचंबित करणारी आहे. करोडो लोक चालत आहेत, गाड्या आहेत, उंट आहेत, हत्ती आहेत पण तरीही इथे सगळ्यांना सुरक्षित वाटत आहे, अशा भावना विदेशी भाविकाने व्यक्त केल्या आहेत.
महाकुंभमध्ये गंगा, यमुना आणि सरस्वती नद्यांच्या संगमावर डुबकी घेण्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. पण, बीबीसीने सरस्वती नदीचा उल्लेखही त्यांच्या लेखात ‘काल्पनिक नदी’ म्हणून उल्लेख केला आहे. दुसरीकडे एका चीनच्या माध्यमांमध्ये आलेल्या लेखात सरस्वती नदीला ‘काल्पनिक नदी’चा दर्जा न देता तिचा नदी म्हणून उल्लेख केला आहे. महाकुंभबद्दल फ्रेंच आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्था AFP कडून आलेल्या लेखात दुःस्वप्न आणि भयभीत असे काही शब्द महाकुंभबद्दल लिहिताना वापरण्यात आले आहेत. एकूणच पाश्चिमात्य देशांमधील माध्यमे ही महाकुंभचे नाकाराताम्क चित्र उभं करण्यात व्यस्त आहेत. हिंदू धर्म हा वेगळाचं असल्याचे ते भासवत आहेत.
‘फ्रेंच २४’ यात म्हटले आहे की, आयोजकांचे म्हणणे आहे की कुंभमेळ्याच्या तयारीचे प्रमाण हे अगदी सुरुवातीपासून देश उभारण्यासारखे आहे. पण ही बाब सत्य असल्याचे बोलले जात आहे. महाकुंभच्या आयोजनासाठी आणि भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी १,५०,००० शौचालये, २०० किलोमीटरच्या सांडपाणी लाईन्स, १,६०,००० तंबू आणि साधारण एका वेळी ५०,००० भाविकांना खाऊ घालू शकतील अशी सामुदायिक स्वयंपाकघरे निर्माण करणे हे शहर वसवण्यासारखेच आहे. ४० चौरस किलोमीटर परिसारत कुंभ मेळ्याचे आयोजन आहे. हे क्षेत्र म्हणजे यात साधारण ४,००० फुटबॉल मैदाने मावतील एवढं भव्य आहे. यासाठी १,२४९ किलोमीटर पिण्याच्या पाण्याची पाईप लाईन्सही बसवण्यात आली आहे. अमेरिका आणि कॅनडा यांच्या एकत्रित लोकसंख्येपेक्षा जास्त लोकांसाठीचे हे नियोजन आहे. टर्किश माध्यम असलेले ‘टीआरटी वर्ल्ड’ यांनी म्हटले आहे की, महाकुंभसाठी ६८,००० लाईट्सचे पोल लावण्यात आले आहेत. हे लाईट्स अगदी अंतराळातूनही दिसून येतात.
हे ही वाचा..
गड किल्ल्यांवरील अतिक्रमण काढण्यासाठी, अतिक्रमणे रोखण्यासाठी जिल्हास्तरीय कमिटी
टोकियोत उभारणार छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा
बुलढाणा केस गळती प्रकरण : आयसीएमआर, एम्सने नमुने गोळा केले
सगळ्या गोष्टी स्वच्छ झालेल्या नाहीत… गळ घातली म्हणून शिबिराला आलोय!
दुसरीकडे, रशियन माध्यम ‘आरटी इंडिया’ हे ‘एक्स’वर काही पोस्ट करून दाखवत आहेत की, त्यांना भारताची किती काळजी आहे. पाश्चिमात्य माध्यमांनी तयार केलेला भारतविरोधी प्रचार ते खोडून काढत आहेत. महाकुंभमधील लाखो भक्त, महाकुंभाचा पवित्र प्रवास असे शब्द वापरून योग्य वर्णनदेखील करत आहेत. सध्या यांची भूमिका योग्य वाटत असली तरी यापूर्वी ‘आरटी’ची भूमिका वेगळी होती. युक्रेन आणि रशिया युद्धानंतर जेव्हा रशियाला जगातील इतर देशांकडून निर्बंधांची भीती आहे तेव्हापासून त्यांची दिशा थोडी बदलली आहे. दुसरीकडे, इस्रायलचा विचार करता तेथील काही लोक महाकुंभमध्ये उपस्थित असून ते भारताच्या प्रेमात पडले आहेत. पाकिस्तानी लोकही गुगलवर महाकुंभ बद्दल शोधत आहेत.