छत्रपती शिवाजी महाराजांची कीर्ती केवळ भारतातच नाही तर सातासमुद्रापलिकडेही पोहोचली आहे. जपानमध्ये ८ मार्च २०२५ रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याची प्रतिष्ठापना केली जाणार आहे. त्याआधी, देशातील १२ राज्यांत या पुतळ्याची भव्य मिरवणूक काढण्यात येत आहे.
सातारा येथून या मिरवणुकीला सुरुवात झाली आहे. त्यावेळी या मिरवणुकीला भरघोस प्रतिसाद मिळाला. अनेक साहसी खेळांचे प्रदर्शनही यावेळी मुलांनी केले. त्यात पट्टा, तलवारी, काठ्या फिरवून शिवकाळातील खेळांचे दर्शन मुलांनी घडविले. १८ जानेवारीला ही यात्रा बेळगावात दाखल झाली असून सायंकाळी ५ वाजता छत्रपती शिवाजी महाराज उद्यान, शहापूर येथे यात्रेचे जंगी स्वागत होणार आहे.
हे ही वाचा:
सगळ्या गोष्टी स्वच्छ झालेल्या नाहीत… गळ घातली म्हणून शिबिराला आलोय!
पाकिस्तानचे गोडवे गाणाऱ्याला ठोकल्या बेड्या
बुलढाणा केस गळती प्रकरण : आयसीएमआर, एम्सने नमुने गोळा केले
ही प्रतिमा ३ मीटर उंच व ३ मीटर लांब आहे. विवेक खटावकर यांनी ही मूर्ती साकारली असून ती ८ मार्चला टोकिया या शहरात बसविली जाईल. जपानमधील असंख्य मराठी बांधवांसाठीही ही अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे.
ही मिरवणूक आम्ही पुणेकर, जपान येथील एडोगावा इंडिया कल्चरल सेंटर ऑल जपान असोसिएशन ऑफ इंडियन्स, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, अक्षोहिणी प्रायव्हेट लि. मराठा बिझनेसमन फोरम यांच्या संयुक्त विद्यमाने ही मिरवणूक काढण्यात येत आहे. जपानस्थित स्मारकात भारतीय इतिहास संशोधक मंडळ व भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेच्या अनेक मौल्यवान पुस्तकांसह १६२० ते १८४० या दरम्यानची पत्रे व चित्रे यांच्या खऱ्या प्रती ठेवण्यात येणार आहेत.