प्रयागराजमधील महाकुंभ २०२५ बाबत भारतीय आणि विदेशी भाविकांमध्ये जबरदस्त उत्साह आणि आकर्षण असल्याचे पाहायला मिळत आहे. लाखोंच्या संख्येने भाविक महाकुंभ मेळाव्यात सहभागी होण्यासाठी येत आहेत. आतापर्यंत ७.३ कोटीहून अधिक भाविकांनी त्रिवेणी संगम येथे पवित्र स्नान केले आहे. अशातच देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीही शनिवार, १८ जानेवारी रोजी प्रयागराज येथे महाकुंभात त्रिवेणीच्या संगमात स्नान केले.
राजनाथ सिंह यांनी त्रिवेणी संगमात स्नान केले. वैदिक मंत्रांचा उच्चारही त्यांनी केला. राजनाथ सिंह येण्यापूर्वी लष्कराने संपूर्ण किला घाटाचा ताबा घेतला होता. सुरक्षेच्या दृष्टीने स्निफर डॉग आणि बॉम्बशोधक पथकाने परिसराचा तपास केला. दुपारी १.३० वाजता त्यांनी अक्षय वटाचे दर्शन घेऊन पूजा केली. यानंतर त्यांनी पातालपुरी आणि बडे हनुमान मंदिरातही दर्शन घेत पूजा केली, यासोबतच ते डिजिटल कुंभ प्रदर्शन पाहण्यासाठीही गेले होते. सायंकाळी साडेसात वाजता अंडावा येथील हेरिटेज रिसॉर्टमध्ये होणाऱ्या विवाह सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. ते प्रयागराज सर्किट हाऊसमध्येच रात्री मुक्काम करणार आहेत.
गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती ।
नर्मदे सिन्धु कावेरि जलेऽस्मिन् सन्निधिं कुरु।आज तीर्थराज प्रयागराज में, भारत की शाश्वत आध्यात्मिक विरासत और लोक आस्था के प्रतीक महाकुंभ में स्नान-ध्यान करके स्वयं को कृतार्थ अनुभव कर रहा हूँ। pic.twitter.com/ZoELPQCcRC
— Rajnath Singh (@rajnathsingh) January 18, 2025
हे ही वाचा..
जसप्रीत बुमराह चॅम्पियन्स ट्रॉफी खेळणार; मोहम्मद शामीलाही संघात स्थान
आरजी कर बलात्कार प्रकरणात संजय रॉय दोषी!
स्वामित्व योजनेंतर्गत ५० हजारांहून अधिक गावांमध्ये ६५ लाख मालमत्ता कार्ड्सचे वितरण
विदेशातील पुरोगाम्यांना महाकुंभाचा मुरडा!
जगातील सर्वात मोठ्या धार्मिक मेळाव्यात सहभागी होण्यासाठी भाविक त्रिवेणी संगमावर येत आहेत. ४५ दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमाच्या पहिल्या चार दिवसांत गंगा, यमुना आणि सरस्वती नद्यांचा पवित्र संगम असलेल्या त्रिवेणी संगमावर सात कोटींहून अधिक भाविकांनी पवित्र स्नान केले आहे. भारतीयांसोबतचं विदेशी भाविकांनाही या महाकुंभाबद्दल उत्सुकता असल्याचे दिसून येत आहे. महाकुंभमधील पवित्र वातावरणाची अनुभूती घेण्यासाठी भाविक प्रयागराज येथे दाखल होत आहेत.