आसाममधील जोरहाट येथे शनिवारी (१३ जून) सकाळी भारतीय हवाई दलाच्या AN-32 या विमानाला भीषण अपघात झाला. माहितीनुसार, जोरहाट एअर फोर्स स्टेशनवर लँडिंग करत असताना विमान अपघातग्रस्त झाले आणि विमानाला भीषण आग लागली. यानंतर आता या अपघातात भारतीय हवाई दलाचे पाच जवान हुतात्मा झाल्याची माहिती समोर आली आहे.
शनिवारी आसाममधील जोरहाट हवाई तळावर टर्बोप्रॉप दुहेरी इंजिन असलेले विमान उतरवण्याचा प्रयत्न करत असताना हा अपघात झाला. भारतीय हवाई दलाने एका निवेदनात म्हटले आहे की, आसामच्या जोरहाट येथे झालेल्या एएन-३२ अपघातात पाच जवानांच्या झालेल्या मृत्यूमुळे त्यांना खेद वाटतो. स्क्वाड्रन लीडर प्रशांत सिंह, फ्लाईट लेफ्टनंट शुभम कुमार, सार्जेंट जितेंद्र शर्मा, अग्निवीरवायू खेमाराम कुमावत आणि अग्निवीरवायू दानिश आलम यांनी कर्तव्यावेळी सर्वोच्च बलिदान दिले,” असे निवेदनात म्हटले आहे.
The Indian Air Force deeply regrets the loss of five personnel in the An-32 accident at Jorhat, Assam.
Sqn Ldr Prashant Singh, Flt Lt Shubham Kumar, Sgt Jitendra Sharma, Agniveervayu Khemaram Kumawat and Agniveervayu Danish Alam made the supreme sacrifice in the line of duty.… pic.twitter.com/9SmOjtS5mU
— Indian Air Force (@IAF_MCC) June 13, 2026
जोरहाट हवाई दल तळावर झालेल्या अपघाताचे कारण शोधण्यासाठी चौकशी समिती नेमण्याचे आदेश देण्यात आले आहेत. घटनास्थळावरून समोर आलेल्या व्हिडीओ आणि छायाचित्रांमध्ये विमानाचे मोठे नुकसान झाल्याचे दिसून येते. विमानाचे अवशेष हवाई तळाच्या विविध भागांत विखुरलेले होते. सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसर ताब्यात घेऊन बचाव, मदत आणि तपासकार्य सुरू केले होते.
हे ही वाचा:
आधी अंतरिम करार लागू होईल, त्यानंतर अणुकार्यक्रमावर चर्चा!
रिलायन्स अनिल अंबानी समूहाच्या दोन माजी अधिकाऱ्यांना अटक
आसामच्या जोरहाटमध्ये भारतीय हवाई दलाच्या AN-32 विमानाचा अपघात
आर्यभट्टांचा अपमान करणाऱ्या अमेझॉनविरोधात कायदेशीर कारवाईचा इशारा
AN-32 हे भारतीय हवाई दलातील सर्वात महत्त्वाच्या वाहतूक विमानांपैकी एक मानले जाते. भारतीय गरजा लक्षात घेऊन विकसित केलेले हे ट्विन-इंजिन टर्बोप्रॉप विमान हवाई दलाचे “वर्कहॉर्स” म्हणून ओळखले जाते. भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात अशा सुमारे १०० विमानांचा समावेश आहे. हे विमान अतिउंच प्रदेश आणि उष्ण हवामानातही प्रभावीपणे कार्य करण्यासाठी विशेषतः उपयुक्त मानले जाते. AN-32 विमान एकावेळी सुमारे ७.५ टन मालवाहतूक, ५० प्रवासी किंवा ४२ पॅराट्रूपर्स वाहून नेऊ शकते. दुर्गम भागांमध्ये रसद आणि पुरवठा पोहोचवण्यासाठी त्याचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो.







