29.9 C
Mumbai
Thursday, June 18, 2026
घरदेश दुनियाबांगलादेशात प्रभू श्रीरामांच्या सर्वात मोठ्या मूर्तीचे बांधकाम थांबवलं

बांगलादेशात प्रभू श्रीरामांच्या सर्वात मोठ्या मूर्तीचे बांधकाम थांबवलं

Google News Follow

Related

बांग्लादेश सरकारने पलाशबाडी उपजिल्हा येथे असलेल्या श्री श्री राधा गोविंद आणि काली मंदिरात भगवान रामांच्या जगातील सर्वात मोठ्या मूर्तीच्या बांधकामाला स्थगिती देण्याचे आदेश दिले आहेत.

कट्टरपंथी इस्लामिक गटांच्या दबावाखाली हा निर्णय घेतल्याचा आरोप होत असून, त्यामुळे हिंदू समाजात नाराजी व्यक्त केली जात आहे. काळ्या दगडातून तयार करण्यात येणाऱ्या या भव्य मूर्तीची किंमत भारतीय चलनानुसार सुमारे १७ कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते. या संपूर्ण प्रकल्पासाठी लागणारे २२ कोटी रुपये भक्तांनी देणगी स्वरूपात दिले आहेत.

मंदिराचे सल्लागार श्यामल कुमार महंता यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, या निर्णयामुळे तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. टीकाकारांचा आरोप आहे की, प्रकल्पाला विरोध करणाऱ्या काही इस्लामिक संघटनांच्या दबावामुळेच बांधकाम थांबवण्यात आले.

हे ही वाचा:

ज्याच्यावर जग हसले, त्यानेच इतिहास लिहिला!

AN-32 विमान अपघातात हवाई दलाचे पाच जवान हुतात्मा

स्पेसएक्सचे नॅस्डॅकवर दमदार पदार्पण

मुंबईतील मोगावीरा सहकारी बँकेवर आरबीआयचा दणका

रामचंद्रपूर गावातील या धार्मिक संकुलात एकूण १४४ देवी-देवतांच्या मूर्ती उभारण्याची योजना आहे. यापूर्वी २५ नोव्हेंबर २०२५ रोजी भगवान कृष्णांची ५० फूट उंच मूर्ती अनावरण करण्यात आली होती. याच परिसरात भगवान शिवांचीही भव्य मूर्ती उभारण्याचे नियोजन आहे. मात्र, विरोध प्रदर्शनांनंतर बांग्लादेश प्रशासनाने बांधकामाची कामे थांबवली आहेत.

निर्वासित बांग्लादेशी लेखिका आणि मानवाधिकार कार्यकर्त्या तस्लिमा नसरिन यांनी या निर्णयावर टीका केली आहे. त्यांनी सोशल मीडियावर म्हटले की, “बांग्लादेशमध्ये लाखो मशिदी आहेत आणि नवीन मशिदी सतत बांधल्या जात आहेत. मग भगवान रामांच्या मूर्तीच्या बांधकामाला इतका विरोध का?”

तस्लीमा नसरीन यांनी असेही म्हटले की, पलाशबाडी परिसरात पूर्वी हिंदू मंदिरे आणि मूर्तींवर झालेल्या हल्ल्यांचा इतिहास लक्षात घेता ही परिस्थिती चिंताजनक आहे आणि त्यामुळे अल्पसंख्याक हिंदू समाज असुरक्षित वाटत आहे.

त्यांनी नमूद केले की इंडोनेशिया, संयुक्त अरब अमिराती, मलेशिया, ओमान यांसारख्या अनेक इस्लामिक देशांमध्ये भव्य हिंदू मंदिरे आहेत. मग बांग्लादेशमध्ये एका मंदिराच्या प्रकल्पाला काही जण अस्तित्वाचा प्रश्न का बनवत आहेत, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच सालेह उद्दिन शोएब चौधरी यांनीही इस्लामिक गटांच्या दबावामुळे मंदिर बांधकाम थांबवल्याबद्दल गंभीर चिंता व्यक्त केली आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
315,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा