बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान याच्यावर त्याच्या घरातच दोन दिवसांपूर्वी हल्ला झाला. यात सैफ अली खान जखमी झाला असून त्याच्यावर मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांकडून या प्रकरणी तपास सुरू असून शनिवारी मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमधून अनुक्रमे दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आल्याचे वृत्त ‘इंडिया टुडे’ने दिले आहे.
पहिल्या संशयिताला मध्य प्रदेशातून मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले होते आणि सध्या त्याची कसून चौकशी केली जात आहे. मुंबई पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेण्यासाठी स्थानिक पोलिसांची मदत घेतल्याची माहिती आहे. तर, दुसरीकडे दुसऱ्या संशयिताला छत्तीसगडच्या दुर्ग जिल्ह्यातून ताब्यात घेण्यात आले. मुंबई पोलिसांनी संशयिताचा फोटो आणि ठिकाणाच्या तपशीलासह रेल्वे पोलिसांना सतर्क केले होते. आकाश अशी ओळख असलेल्या संशयिताला ज्ञानेश्वरी एक्सप्रेस ट्रेनमधून रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
छत्तीसगड रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई पोलिसांनी शेअर केलेला हल्ला प्रकरणातील आरोपीचा फोटो ट्रेनमधून ताब्यात घेतलेल्या व्यक्तीच्या दिसण्याशी जुळतो. मात्र, मुंबई पोलीस छत्तीसगडमध्ये पोहोचून पुढील चौकशी केल्यानंतर अंतिम खात्री केली जाईल, अशी माहिती आहे.
हे ही वाचा..
तंत्रज्ञानाच्या मदतीने आरोग्य क्षेत्रात आमूलाग्र बदल करत मानवी जीवन सुसह्य करणे शक्य
केईएम रुग्णालयाचे शताब्दी वर्ष समाज उपयोगी ठरावे
राजनाथ सिंह यांनी त्रिवेणीच्या संगमात केले स्न्नान
जसप्रीत बुमराह चॅम्पियन्स ट्रॉफी खेळणार; मोहम्मद शामीलाही संघात स्थान
अभिनेता सैफ याच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर त्याच्या मानेवर आणि मणक्याजवळ चाकूच्या जखमा झाल्या आहेत. यानंतर त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली असून सध्या त्याची प्रकृती स्थिर आहे. अद्याप आरोपीचा शोध घेतला जात असूननुकतेच एक ताजे सीसीटीव्ही फुटेज समोर आले होते, ज्यामध्ये तो सैफ अली खानवर हल्ला केल्यानंतर दादरमधील एका दुकानातून हेडफोन खरेदी करताना दिसल्याचे सांगण्यात येत होते. मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोराने मुंबईत फिरण्यासाठी किंवा दुसऱ्या ठिकाणी पळून जाण्यासाठी वांद्रे येथून ट्रेन पकडली असावी. मुख्य आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांची अनेक पथके सध्या शहरातील विविध रेल्वे स्थानकांच्या सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करत आहेत.