विधानपरिषदेच्या निवडणुकांसाठी उमेदवारांची अधिकृतपणे घोषणा होण्यास सुरुवात झाली असून भाजपनंतर आता ठाकरे गटाने महाविकास आघाडीचा उमेदवार जाहीर केला आहे. अंबादास दानवे यांचे नाव विधानपरिषदेचे उमेदवार म्हणून जाहीर करण्यात आले आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून विधानपरिषदेसाठी उद्धव ठाकरेंचे नाव चर्चेत होते.
राज्यातील विधानपरिषद निवडणुकीसाठी भाजपने सहा उमेदवार जाहीर केल्यानंतर आता ठाकरे गटानेही आपला उमेदवार जाहीर करत सस्पेन्स संपवला आहे. उद्धव ठाकरे यांच्या जागी अंबादास दानवे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. आदित्य ठाकरे यांनी याबाबतची माहिती दिली.
उद्धव ठाकरे यांनीच विधानपरिषदेवर जावं अशी महाविकास आघाडीतील नेत्यांची इच्छा होती. त्यात, ठाकरे गटातील नेत्यांनीही उद्धव ठाकरेंच्याच नावाचा आग्रह धरला होता. मात्र, आता उद्धव ठाकरे यांच्याजागी अंबादास दानवे यांची उमेदवार म्हणून निवड झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. याशिवाय महाविकास आघाडीमधील घटक पक्ष असलेले कॉंग्रेस आणि शरद पवार गट यांची प्रतिक्रिया काय असणार याकडे लक्ष असणार आहे. काँग्रेसने ठाकरेंशिवाय दुसरा उमेदवार दिल्यास आम्ही उमेदवार देणार अशी भूमिका घेतली होती.
अंबादास दानवे हे उद्या सकाळी ११ वाजता ते उमेदवारी अर्ज दाखल करतील. दरम्यान, काही महिन्यांपूर्वी अंदाबास दानवे यांचा कार्यकाळ संपुष्टात आला होता. विधान परिषदेच्या १० जागांसाठी १२ मे रोजी मतदान होणार आहे. १२ मे रोजी सकाळी ९ वाजल्यापासून दुपारी ४ वाजेपर्यंत मतदान होईल. तर १२ मे रोजीच निकाल जाहीर होणार आहे.
हे ही वाचा:
पश्चिम बंगालच्या फाल्टामध्ये इव्हीएममधील भाजपच्या बटणावर लावली टेप
जपानमध्ये प्रदर्शित होणार ‘धुरंधर’
पश्चिम बंगालच्या फाल्टा येथील संयुक्त ब्लॉक विकास अधिकाऱ्याची बदली
नाशिक कॉर्पोरेट जिहाद प्रकरणातील निदा खानचे मालेगाव आणि मलेशियाशी संबंध
विधानसभेतील संख्याबळानुसार भाजपच्या वाट्याला सहा, शिवसेना दोन, राष्ट्रवादी एक आणि महाविकास आघाडी एक अशा जागा येणार आहेत. विधान परिषदेचा एक आमदार निवडून येण्यासाठी २८ मतांचा कोटा आवश्यक आहे. महायुतीत भाजप (१३१ आमदार), शिवसेना (५७ आमदार) आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी (४० आमदार) अशी संख्या पाहता महायुतीचे नऊ उमेदवार सहज निवडून येऊ शकतात. तर महाविकास आघाडीचे एकूण संख्याबळ ४६ आहे. त्यामुळे त्यांचा केवळ एकच उमेदवार सहज निवडून येऊ शकतो.







