29 C
Mumbai
Saturday, April 20, 2024
घरराजकारणमहाराष्ट्रात एकच सहकारी साखर कारखाना का सुस्थितीत आहे?

महाराष्ट्रात एकच सहकारी साखर कारखाना का सुस्थितीत आहे?

Google News Follow

Related

गृहमंत्री, सहकार मंत्री अमित शहांनी विचारला प्रश्न

महाराष्ट्रात जिल्हा सहकारी बँका आदर्शवत होत्या. पण त्यातल्या केवळ तीनच शिल्लक राहिल्या. त्यात घोटाळे, घपले कुणी केले. रिझर्व्ह बँकेने तर केले नाहीत ना? यात मी राजकारण आणणार नाही. प्रवरानगरचा साखर कारखाना ज्या उद्देशाने सुरू केला. तो अजूनही, सहकारी पद्धतीने चालला आहे. महाराष्ट्रातील अनेक सहकारी कारखाने खासगी झाले. पण त्यात एक तरी शिल्लक राहिला. महाराष्ट्राचे जे सहकार आंदोलनातील काम आहे ते लक्षात ठेवायला हवे. प्रवराच्या साखर कारखान्याने एक गोष्ट दाखविली की प्रशासन उत्तम असेल तेव्हा वर्षानुवर्षे कारखाना चालवता येतो, अशा शब्दांत भारताचे गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी महाराष्ट्रातील सहकार चळवळीबद्दलची आपली भूमिका मांडली.

प्रवरानगर येथे डॉ. विखे पाटील रुग्णालयाचे उद्घाटन अमित शहा यांच्या हस्ते झाले. राधाकृष्ण विखे पाटील यांनी आयोजित केलेल्या देशातील पहिल्या सहकार परिषदेच्या निमित्ताने अमित शहा महाराष्ट्रात आले आहेत.

अमित शहा आपल्या भाषणात म्हणाले की, सरकार तुमच्यासोबत आहे. सहकार चळवळीवर कुणी अन्याय करणार नाही. आम्हालाही पारदर्शकता आणावी लागेल. व्यावसायिकता आणावी लागेल, तशा युवकांना जोडायला हवे. त्यांच्या हातात ही धुरा द्यायला हवी. ही चळवळ आणखी १०० वर्षे पुढे न्यायची आहे. याप्रसंगी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हेदेखील उपस्थित होते.

छत्रपती शिवाजी महाराज आणि संत ज्ञानेश्वर, शिर्डीच्या साईबाबांना नमन करून अमित शहा म्हणाले की, सहकारासाठी काशीएवढाच महाराष्ट्र पवित्र आहे. सहकाराचा पाया विखे पाटलांनी घातला. देशभरातील सहकार चळवळीतील कार्यकर्त्यांनी महाराष्ट्राची माती कपाळाला लावायला हवी.

हे ही वाचा:

अनिल परब, हा तुझ्या बापाचा पैसा आहे का?

समीर वानखेडेंचा कार्यकाळ संपला; कुठे होणार बदली?

मुलीचे लग्नाचे वय १४ हवे; खासदार बर्क यांची बकबक

शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे की अनिल परब?

 

अमित शहा यांनी सांगितले की, गेल्या ७५ वर्षे सहकार मंत्रालय नव्हते, पण मोदींनी ७५ वर्षांत सहकार मंत्रालय बनविले कारण त्यांना याचे महत्त्व माहीत आहे. महाराष्ट्रातील साखर कारखान्यांना नव्या नजरेतून बघण्यासाठी आम्ही त्याचा डिटेल अभ्यास केला. साखर मिल सुरू राहाव्यात असा आमचा प्रयत्न आहे. सरकारी साखर कारखाने खासगी होऊ नयेत अशी काळजी घेतली जाईल.

सहकार मंत्री बनलो तेव्हा अनेक प्रश्न उपस्थित केले. पण मी तोडण्यासाठी नव्हे जोडण्यासाठी आलो आहे. राज्य सरकारने राजकारणातून बाहेर येऊन सहकाराकडे पाहावे. सहकार खाते कुणाकडे आहे यावर प्रश्न सुटणार का, मी सगळ्यांना सांगू इच्छितो मला सल्ला देण्यापेक्षा आरसा पाहा. राजकीय आंदोलनातून बाहेर पडा आणि सहकार क्षेत्राला वर आणा. मी मूक प्रेक्षक बनणार नाही. म्हणून आम्ही यापलिकडे विचार केला पाहिजे. युनिट कोण चालवत आहे हे पाहिले जाणार नाही तर कसे चालले आहे हे पाहिले जाईल, असेही अमित शहा यांनी सांगितले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
147,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा