28 C
Mumbai
Thursday, March 28, 2024
घरराजकारणशिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे की अनिल परब?

शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे की अनिल परब?

Google News Follow

Related

शिवसेना नेते आणि माजी मंत्री रामदास कदम यांनी आज शिवसेनेला घरचा आहेर दिला आहे. पत्रकार परिषद घेत रामदास कदम यांनी शिवसेना नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर हल्लाबोल केला आहे. शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे आहेत की अनिल परब? असा सवाल रामदास कदम यांनी विचारला आहे. तर ‘अनिल परब यांनी शिवसेना पक्ष राष्ट्रवादीकडे गहाण टाकला आहे’ असा घणाघात रामदास कदम यांनी केले आहे. कदम यांच्या या पत्रकार परिषदेमुळे महाविकास आघाडीतील पक्षांची अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर आली आहे. तर शिवसेना पक्षातील अंतर्गत कलहही उघड्यावर पडला आहे.

शिवसेना नेते रामदास कदम हे शिवसेनेत नाराज असल्याच्या बातम्या गेले काही दिवस कानावर येत होत्या. दापोली येथील अनिल परब यांच्या रिसॉर्टवर कारवाई करण्यासाठी कदम यांनी भाजपा नेते किरीट सोमैय्या यांना मदत केल्याचा आरोप रामदास कदम यांच्यावर करण्यात आला होता. त्याची एक ध्वनिफीतही व्हायरल झाली होती. त्यावरूनच कदम यांच्या विरोधात वातावरण तयार झाले होते. त्याबाबत स्पष्टीकरण देण्यासाठी कदम यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी अनिल परब यांच्यावर निशाणा साधला आहे.

“गेले दोन वर्ष परब हे रत्नागिरीचे पालकमंत्री आहेत. पण १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी शिवाय जिल्ह्यात फिरकले नाहीत. परब यांनी जिल्हा वाऱ्यावर सोडला आहे. तर अनिल परब यांच्या विरोधात बोलले म्हणजे शिवसेनेच्या विरोधात बोलले असे होते का? असा सवाल रामदास कदम यांनी विचारला आहे. अनिल परब यांच्या खासगी मालमत्तेवर झालेल्या कारवाईबद्दल बोलले म्हणजे शिवसेनेच्या विरोधात बोलणे होत नाही. ती परबांची खासगी मालमत्ता आहे, शिवसेनेची मालमत्ता नाही” असे कदम यांनी म्हटले आहे.

तर आपल्या मुलाला तिकीट मिळू नये म्हणून अनिल परब आग्रही होते. यासाठी राष्ट्रवादीच्या संजय कदम यांना घेऊन ते मातोश्रीवर गेले होते. पण उद्धव ठाकरेंनी त्यांचे ऐकले नाही. माझ्या मुलाला योगेश कदम यालाच तिकीट दिले. त्याचा राग परब यांनी मनात ठेऊन मला आणि माझ्या मुलाला संपवण्यासाठी अनिल परब काम करत आहेत असा आरोप कदम यांनी केला आहे.

“आगामी नगर पंचायत निवडणुकीत माझ्या मुलाला डावलण्यात येत आहे. तो स्थानिक आमदार आहे. पण त्याला बाजूला सारून राष्ट्र्रवादीला जवळ करण्याचे काम अनिल परब करत आहेत. अनिल परब यांनी राष्ट्रवादीचे संजय कदम, सुनील तटकरे, सूर्यकांत दळवी आणि शिवसेना नेते उदय सामंत यांना मुंबईच्या कार्यालयात बोलवून घेतले आणि तिकीट वाटप केले” अशा आरोपांच्या फैरी रामदास कदम यांनी झाडल्या आहेत.

हे ही वाचा:

‘अशोकराव, उद्धवजी मुख्यमंत्री नसते तर तुम्ही कुठे असता?’

‘अमरावतीची घटना पुन्हा घडली तर त्यांना सोडायचे नाही’

मुंबईत काळाबाजारीचे दहा कोटींचे गहू, तांदूळ जप्त

विद्यापीठाच्या स्वायत्ततेवर ठाकरे सरकारचा घाला

शिवसेनेची ताकद जास्त असूनही राष्ट्रवादीला जास्त जागा देण्यात आल्या आहेत. शिवसेनेचे नगरसेवक जास्त असूनही पहिली २.५ वर्ष नगराध्यक्ष राष्ट्रवादीचा असणार आहे. आम्ही संघर्ष करून मिळवलेला मतदारसंघ राष्ट्रवादीच्या घशात घालण्याचे काम अनिल परब यांनी केले आहे. शिवसेना पक्ष राष्ट्रवादीकडे गहाण ठेवण्याचे काम अनिल परब करत आहेत. ज्यांनी शिवसेना मोठी केली आणि राष्ट्रवादी गाडली त्यांचीच हाकलपट्टी करण्यात आली आहे. तर अनिल परब हे राष्ट्रवादीचे नेते असल्यागतच बोलत असल्याचा टोला रामदास कदम यांनी लगावला आहे.

यावेळी रामदास कदम हे भावनिक झालेले पाहायला मिळाले. उद्धव ठाकरेंना त्यांनी जुन्या गोष्टींची आठवण करून दिली. “उद्धवजी तुमची वाईट वेळ होती तेव्हा तुमच्या गाडीत पुढे मी बसलेलो असायचो. पण आज आमची ही गत आहे. पक्षाशी निष्ठावान राहूनही आम्हाला डावलण्यात येत आहे. आम्हाला संपवण्याचा प्रयत्न केला जात आहे. तेव्हा शिवसेनाप्रमुख ही उद्धव ठाकरे आहेत की अनिल परब आहेत? असा प्रश्न आम्हाला पडत आहे” असे रामदास कदम म्हणाले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
144,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा