33 C
Mumbai
Sunday, November 1, 2026
घरराजकारण‘शीख नरसंहाराच्या दिवशी काँग्रेसने रॅली काढत जखमांवर मीठ चोळले...’

‘शीख नरसंहाराच्या दिवशी काँग्रेसने रॅली काढत जखमांवर मीठ चोळले…’

अमित शाह यांचा राहुल गांधींवर निशाणा

Google News Follow

१९८४ मधील शीखविरोधी दंगलींचा मुद्दा उपस्थित करत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली. १ नोव्हेंबर १९८४ रोजी दिल्लीमध्ये हजारो शीख नागरिकांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. याच दिवसाची निवड करून काँग्रेसने दिल्लीत राजकीय सभा आयोजित केली. हत्याकांडातील पीडितांच्या कुटुंबीयांच्या वेदनांचा विचार न करता सभा घेणे म्हणजे शीख समुदायाच्या जुन्या जखमांवर मीठ चोळण्यासारखे आहे, अशी टीका शाह यांनी केली. पंजाब आणि देशातील नागरिक १९८४ मधील त्या भीषण घटनेला कधीही विसरू शकणार नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

चंदीगडमधील सेक्टर १७ येथील तिरंगा पार्कमध्ये आयोजित कार्यक्रमात बोलताना शाह यांनी तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांच्या विधानाचाही उल्लेख केला. ‘जेव्हा मोठे झाड कोसळते, तेव्हा धरती हादरते,’ असे विधान राजीव गांधी यांनी केले होते. १९८४ मधील हिंसाचारात हजारो शीख नागरिकांचा बळी गेला, अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली, असंख्य मुले अनाथ झाली आणि महिलांना वैधव्य आले. अशा भीषण हत्याकांडाचे समर्थन करणारे विधान तत्कालीन काँग्रेस नेतृत्वाची भूमिका स्पष्ट करणारे होते, असा आरोप शाह यांनी केला.
हे ही वाचा:
पंजाबमध्ये ४० उमेदवारांची पहिली यादी जाहीर होताच ‘आप’मध्ये बंडखोरी

मारुती सुझुकीची विक्री ऐतिहासिक उच्चांकावर

जीएसटी महसुलात ऑक्टोबरमध्ये २.३१ लाख कोटींचे विक्रमी संकलन

इशान किशन ठरला यंदा टी-२०त सर्वाधिक धावा करणारा फलंदाज

या दंगलींशी संबंधित प्रकरणांचा तपास पुन्हा सुरू करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने पावले उचलली आणि पीडित कुटुंबांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची आर्थिक मदत दिल्याचा दावाही अमित शाह यांनी केला. राहुल गांधी यांच्या सभेवर टीका करताना भाजप आणि दिल्लीतील व्यापाऱ्यांनी दिवाळीच्या व्यवसायाचे कारण देत सभेची तारीख बदलण्याची विनंती केली होती; मात्र काँग्रेसने त्याकडे दुर्लक्ष केल्याचे शाह म्हणाले. राहुल गांधी यांच्या ‘मोहब्बत की दुकान’ या घोषणेवरही त्यांनी टीका केली.

दरम्यान, या कार्यक्रमातून अमित शाह यांनी पंजाबच्या राजकारणावरही भाष्य केले. आगामी काळात पंजाबमध्ये एनडीएचे सरकार स्थापन करण्यासाठी नागरिकांनी पाठिंबा द्यावा, असे आवाहन त्यांनी केले. उपस्थितांकडून हात वर करून एनडीए सरकार स्थापनेचा संकल्पही करून घेतला. त्यामुळे १९८४ मधील शीखविरोधी दंगली, काँग्रेसची ऐतिहासिक भूमिका आणि पंजाबमधील आगामी राजकीय समीकरणे हे शाह यांच्या भाषणाचे प्रमुख मुद्दे ठरले.

 

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
340,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा