31 C
Mumbai
Monday, March 30, 2026
घरराजकारण“एकनाथ शिंदेंना भेटायला जाण्यासाठी देवेंद्रजी वेशांतर करून जायचे”

“एकनाथ शिंदेंना भेटायला जाण्यासाठी देवेंद्रजी वेशांतर करून जायचे”

Google News Follow

Related

अमृता फडणवीस यांनी उघड केले रहस्य

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर विधानसभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाषणात नवनवीन खुलासे केले होते. बंड केल्यानंतरच्या घडामोडींबद्दल एकनाथ शिंदेंनी सांगितले होते. त्यानंतर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी सत्तास्थापनेपूर्वीच्या एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटींविषयी मोठा गौप्यस्फोट केला आहे.

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अमृता फडणवीस म्हणाल्या की, “एकनाथ शिंदे यांना भेटायला जाण्यासाठी देवेंद्रजी वेशांतर करून जायचे. शिवाय देवेंद्रजी मुख्यमंत्री होणार नाहीत, हे देखील आपल्याला आधीच माहित होतं,” असेही त्यांनी म्हटलं आहे.

हे ही वाचा:

‘महाविकास आघाडीमुळे हिंदुत्वासाठी निर्णय घेऊ शकलो नाही’

नुपूर शर्मांचे शीर कापणाऱ्यास घर देण्याची भाषा करणाऱ्या सलमान चिश्तीला अटक

ब्रिटनच्या आरोग्य सचिव, अर्थमंत्र्यांनी दिला राजीनामा

रिक्षाच्या स्पीडपुढे मर्सिडिजचा स्पीड फिका पडला…

एकनाथ शिंदे यांनी भाषण करताना दिलखुलास भाषण केले. यावेळी त्यांनी सरकार स्थापनेसंदर्भातील अनेक गुपितं उलगडली. यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले होते की, “मी आणि देवेंद्र फडणवीस अंधार झाल्यावर भेटायचो. सगळे आमदार झोपल्यावर जायचो आणि सगळे उठायच्या आधी यायचो, असं एकनाथ शिंदे म्हणाले. त्यानंतर अमृता फडणवीस यांनी केलेल्या वक्तव्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
300,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा