27 C
Mumbai
Wednesday, December 10, 2025
घरराजकारणआज अंधेरीची पोटनिवडणूक, ऋतुजा लटके यांच्यासमोर आव्हान

आज अंधेरीची पोटनिवडणूक, ऋतुजा लटके यांच्यासमोर आव्हान

मुंबईतील अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी गुरुवारी मतदान

Google News Follow

Related

मुंबईतील अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी गुरुवारी मतदान होत आहे. शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके यांच्याशिवाय चार अपक्ष, आपकी अपनी पार्टीचा एक आणि राईट टू रिकॉल पार्टीचा एक असे सहा उमेदवार रिंगणात आहेत. निकाल ६ नोव्हेंबरला लागणार आहे. ऋतुजा लटके यांच्या विरोधात काँग्रेस आणि राष्ट्रवादीने उमेदवार दिलेला नाही. या अर्थाने त्या महाविकास आघाडीच्या संयुक्त उमेदवार आहेत. दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी असल्याने ऋतुजा लटके यांच्या बाजूने उमेदवारी मागे घेण्याचे आवाहन राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना केले होते. यानंतर भाजपने आपले उमेदवार मुरजी पटेल यांचा उमेदवारी अर्ज मागे घेतला होता.

अंधेरी पूर्व विधानसभा मतदार संघातून २०१९ मध्ये शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आलेले रमेश लटके यांचे काही महिन्यांपूर्वी अचानक निधन झाले. त्यामुळे त्याजागी आता पोट निवडणूक होत आहे. ही निवडणूक जाहीर झाल्यापासून अनेक राजकीय घडामोडी घडल्या. विशेष म्हणजे राज्यात झालेल्या नव्या सत्तांतरानंतर होत असलेली ही पहिलीच निवडणूक आहे. त्यामुळे सगळ्याच पक्षांसाठी ती प्रतिष्ठेची बनली आहे. ऋतुजा लटके यांच्या उमेदवारी वरूनही अनेक अडचणी आल्या. उमेदवारी अर्ज भरण्यापासून ते प्रत्यक्ष निवडणूक रिंगणात उभे राहीपर्यन्त अनेक घडामोडी घडल्या होत्या.

भाजपने या जागेसाठी व्यापारी मुरजी पटेल यांना उमेदवारी दिली होती आणि एकनाथ शिंदे गटानेही मुरजी पटेल यांना पाठिंबा जाहीर केला होता, परंतु भाजपने उमेदवारी दाखल केल्यानंतर अवघ्या ४ दिवसांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. विधवेसमोर निवडणूक लढवून भाजपला महाराष्ट्राची संस्कृती बदनाम करायची नाही, असे यामागचे कारण देण्यात आले.परंतु त्यानंतरही उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेकडून उलटसुलट आरोप करण्यात आले होते.

हे ही वाचा:

भगतसिंगांच्या फाशीचा प्रसंग साकारताना शाळकरी मुलाचा मृत्यू

मुंबई महापालिकेच्या कामांची होणार ‘कॅग’कडून चौकशी

मोरबी दुर्घटनेत १३२ लोकांचा मृत्यू, अनेकांना वाचवण्यात पथकाला यश

भारताचा दक्षिण आफ्रिकेकडून पराभव पण पाकिस्तानची गोची

अंधेरीच्या या पारंपरिक जागेवर काँग्रेस पक्ष पहिल्यांदाच निवडणूक लढवत नसून या जागेवर शिवसेना पक्षाच्या उमेदवाराला पाठिंबा देत आहे. अंधेरीच्या या विधानसभेच्या जागेवर प्रत्येक वेळी काँग्रेसची शिवसेना आणि भाजपच्या उमेदवारांशी स्पर्धा झाली आहे, मात्र यावेळी उलट आहे. ना भाजप समोर आहे, ना काँग्रेस, ना राष्ट्रवादी, ना राज ठाकरेंचा मनसे, ना समाजवादी पक्ष किंवा इतर कोणतेही राष्ट्रीय किंवा प्रादेशिक पक्ष. तरीपण या निवडणुकीत ऋतुजा लटके यांचे पारडे जाड असल्याचे मानले जात आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा