29 C
Mumbai
Saturday, April 20, 2024
घरविशेषमिनीटॉय ट्रेनची शिट्टी ३ वर्षानी वाजली पण अनर्थ टळला

मिनीटॉय ट्रेनची शिट्टी ३ वर्षानी वाजली पण अनर्थ टळला

माथेरानच्या मिनीट्रेनचा अनर्थ टळला

Google News Follow

Related

दिवाळी निमित्त पर्यटन क्षेत्राला उधाण आले आहे. कोरोना नंतर लॉकडाऊन यामुळे सर्वत्र प्रतिबंध लावण्यात आले होते. त्यामुळे माथेरानची मिनी ट्रेन म्हणून ओळखली जाणारी टॉय ट्रेन ३ वर्षानी चालू करण्यात आली होती. तसेच माथेरान हे पर्यटन क्षेत्र ही पर्यटकांनी फुलून आले आहे. याच दरम्यान एक दुर्घटना टळली आहे. माथेरान-नेरळ मिनी ट्रेनच्या मार्गावर अज्ञात व्यक्तिनीकडून लोखंडी तुकडा ठेवण्यात आला होता. ही घटना रविवारी सायंकाळी ५ च्या सुमारास घडली आहे. अशी माहिती मिनी ट्रेनचे लोको पायलट दिनेश चंद्र मीना आणि सहायक लोको पायलट सुधांशु पी यांनी मध्य रेल्वे प्रशासनाला दिली.

रविवारच्या दिवशी सायंकाळी हा अनर्थ मिनी ट्रेनचे लोको पायलट दिनेश चंद्र मीना आणि सहायक लोको पायलट सुधांशु पी यांच्या सतर्कतेमुळे हा अनर्थ टळला. सध्या विद्यार्थ्यांना शाळेची सुट्टी असल्याने माथेरानमध्ये पर्यटकांची गर्दी दिसून येत आहे. पर्यटकांच्या गर्दीमुळे मिनी ट्रेनlला ही चांगला प्रतिसाद आहे. तसेच घडलेल्या प्रसंगाची माहिती देण्यात आली असून, घटनेची दखल घेऊन मध्य रेल्वेकडून चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

तसेच माथेरान ते नेरळ ही ट्रेन मागील ३ वर्षापासून बंद होती या वर्षी २०२२ मध्ये ऑक्टोबरच्या २२ ला पुन्हा सुरू करण्यात आली. दिवसभरात या मिनी ट्रेनचे ४ फेऱ्या होतात. नेरळ ते अमन लॉज असा या ट्रेनचा मार्ग आहे. अमन लॉज ते माथेरान अशी शटल सेवा ही चालवण्यात येते. सध्या या मार्गावर ६ डब्ब्यांच्या तीन मिनी ट्रेन आहेत. तसेच या तिन्ही ट्रेन डिजेल इंजिनवर धावतात.

हे ही वाचा:

मनसे पुण्यात ३५०० ‘अ‍ॅम्बेसेडर’ नेमणार

ब्रिजभूषण सिंह महाराष्ट्रात येणार, मनसे विरोध करणार?

पावाचे वाढले ‘भाव’ देवा आता धाव

दिलासा नाहीच, संजय राऊत यांची न्यायालयीन कोठडी वाढली

रविवारी सायंकाळी ५ च्या सुमारास ही घटना घडली असून लोको पायलट यांच्या सतर्कतेमुळे हा आनार्थ टळला. लोखंडी रॉड म्हणजे रुळाखाली वापरण्यात येणारे लोखंडी पट्टी होय. हा लोखंडी तुकडा लगेच बाजूला करून, मिनी ट्रेन पुढे नेण्यात आली. तसेच संबंधीत घटनेची चौकशी केली जाणार असल्याची माहिती मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी सांगितले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
147,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा