31 C
Mumbai
Sunday, May 5, 2024
घरराजकारणदेशमुख लगबगीने दिल्लीला..अभिषेक मनू सिंघवींच्या घरी

देशमुख लगबगीने दिल्लीला..अभिषेक मनू सिंघवींच्या घरी

Google News Follow

Related

महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या खंडणीखोरीच्या आरोपात सीबीआय चौकशीचे आदेश उच्च न्यायालयाने सोमवारी दिले. या चौकशीच्या आदेशांनंतर अनिल देशमुख ह्यांच्यावर राजीनामा देण्याची नामुष्की ओढवली. सोमवारी संध्याकाळी त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आपला राजीनामा सुपूर्द केला. पण राजीनामा दिल्यानंतर देशमुख हे तडक दिल्लीकडे रवाना झाल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या. देशमुखांच्या या दिल्ली दौऱ्याने ते सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे बोलले जात आहे. देशमुख यांनी जेष्ठ वकील अभिषेक मनू सिंघवी यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली आहे.

परमबीर सिंह यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पत्र लिहीत राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर खंडणीखोरीचे आरोप केले होते. सचिन वाझे याला गृहमंत्र्यांनी महिना १०० कोटी रूपये आणून देण्याचे टार्गेट दिले होते असा गंभीर आरोप या पत्रात करण्यात आला होता. या पत्रावरून डॉक्टर जयश्री पाटील यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यांच्या याचिकेवर सुनावणी करताना उच्च न्यायालयाने सीबीआय चौकशीचे आदेश दिले आहेत. अनिल देशमुख यांच्याविरोधात पुढील पंधरा दिवसात प्राथमिक चौकशी करून दखलपात्र गुन्हा आढळल्यास एफआयआर नोंदवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. डॉक्टर जयश्री पाटील यांनी उच्च न्यायालयाबाहेर ही माहिती माध्यमांना दिली. या याचिकेवर सुनावणी करत असताना, अनिल देशमुख गृहमंत्री पदावर असताना, पोलीस निष्पक्ष तपास करू शकत नाहीत. असे निरीक्षण उच्च न्यायालयाने नोंदवले आहे.

हे ही वाचा:

दिलीप वळसे-पाटील नवे गृहमंत्री?

अनिल देशमुखांचा राजीनामा हे केवळ हिमनगाचं टोक

अखेर अनिल देशमुखांचा राजीनामा

कुबेरांच्या ‘निर्भीड’पणाचे रहस्य काय?

या निर्णयानंतर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्यात एक बैठक पार पडली. या बैठकीनंतर अनिल देशमुख हे नैतिकतेच्या मुद्द्यावरून राजीनामा देणार असल्याचे सांगण्यात आले. देशमुख यांनी संध्याकाळी उद्धव ठाकरे यांच्याकडे राजीनामा देऊन थेट दिल्ली गाठली. देशमुख आता उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार असल्याचे म्हंटले जात आहे. जेष्ठ विधिज्ञ अभिषेक मनू सिंघवी हे देशमुखांची बाजू मांडणार असल्याचे म्हटले जात आहे. दिल्लीत देशमुख यांनी अभिषेक मनू सिंघवी यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
150,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा