30 C
Mumbai
Thursday, March 28, 2024
घरक्राईमनामाअनिल परबांचे सहकारी खरमाटेची ईडीकडून ४ तास चौकशी

अनिल परबांचे सहकारी खरमाटेची ईडीकडून ४ तास चौकशी

Google News Follow

Related

राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. अनिल परब यांचे निकटवर्तीय मानले जाणारे बजरंग खरमाटे यांना ईडीनं नोटीस बजावली आहे. अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) उप प्रादेशिक परिवहन अधिकारी  बजरंग खरमाटे हे सोमवारी दुपारी १२ वाजता ईडीच्या चौकशीला हजर राहिले. मनी लाँड्रिंग प्रकरणी खरमाटे हे चौकशीला आले आहेत.

“तासगाव सांगली, येथील बजरंग खरमाटे यांच्या फार्म हाऊसची पाहणी केली. खारमटेंच्या आणखी ४ बेनामी मिळकती सांगली येथे आहे. अनिल परबचे सहाय्यक खरमाटे यांच्याकडे सांगली, पुणे, बारामती, मुंबई येथे ४० हून अधिक अधिकृत/बेनामी मिळकत आहेत.” असं ट्विट करत भाजपा नेते किरीट सोमैया यांनी खरमाटेवर आरोप केले आहेत. .

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरती असलेल्या बदली गैर व्यवहार प्रकरणात खरमाटे याचं नाव समोर आल्यानंतर ईडीचा ससेमिरा त्यांच्या मागे लागला. काही दिवसांपूर्वी खरमाटेच्या घरावर ईडीने छापा टाकला होता. ४.३० तास झाले खरमाटे यांची चौकशी सुरू आहे. या कारवाई दरम्यान काही महत्वाचे पुरावे हाती लागले असल्यानेच ईडीने खरमाटे यांना चौकशसाठी आज बोलावले आहे.

हे ही वाचा:

अनिल परबचे सहाय्यक खरमाटेंकडे साडेसातशे कोटींची मालमत्ता आली कुठून?

बेळगावात कमळाला कौल; शिवसेनेचे समर्थन असलेले उमेदवार पराभूत

अभिषेक बॅनर्जी ईडी कार्यालयात

समोरच्यांवर बोलण्यापेक्षा आपल्या पक्षातल्या लोकांना आधी शिकवावं

ईडीच्या माध्यमातून परिवहन मंत्री अनिल परब यांना हजर राहण्याची नोटीस देण्यात आली तर आरटीओ अधिकारी बजरंग खरमाटे यांच्या निवासस्थानी कार्यालयावर छापे मारण्यात आले. या प्रकरणी ईडीने जबाब देण्यासाठी बोलवावे, डिजिटलसह सर्व पुरावे सादर करेल असा इशारा गजेंद्र पाटील यांनी दिल्यानं परिवहन खात्यात खळबळ उडाली असून ईडीच्या भूमिकेकडे लक्ष लागलाय.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
144,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा