34 C
Mumbai
Tuesday, April 23, 2024
घरक्राईमनामाममता बॅनर्जींचा पुतण्या अभिषेकला ईडीने बोलावून घेतले

ममता बॅनर्जींचा पुतण्या अभिषेकला ईडीने बोलावून घेतले

Google News Follow

Related

ममता बॅनर्जींचा पुतण्या आणि तृणमूल काँग्रेसचे महासचिव अभिषेक बॅनर्जी आज जाम नगर स्थित ईडी कार्यालयात चौकशीसाठी दाखल झाले आहेत. पश्चिम बंगालमधील कथित कोळसा घोटाळ्याशी संबधित मनी लॉण्ड्रिंग प्रकरणी ईडीनं अभिषेक बॅनर्जी यांना चौकशीसाठी बोलावलं आहे. अभिषेक बॅनर्जी यांच्याकडून ईडीच्या अधिकाऱ्यांनी पीएमएलए कायद्यांतर्गत लेखी शपथ लिहून घेतली आहे. मी माज्या चौकशी दरम्यान कोणतीही चुकीची माहिती देणार नाही, जर असं झालं तर त्यासाठी मी स्वतः जबाबदार असेल, अशी शपथ लिहून घेतली आहे. तसेच ईडी कार्यालयाच्या मागील गेटवर अभिषेक बॅनर्जीच्या संरक्षणासाठी मोठ्या प्रमाणात सुरक्षा कर्मचारी तैनात आहेत.

दिल्लीत पोहोचण्यापूर्वी कोलकाता विमानतळावर अभिषेक बॅनर्जी यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी भाजपवर निशाणा साधला. ते म्हणाले की, राज्यात पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये झालेल्या पराभवामुळं भाजपा राजकीय बदला घेत आहे. मी कोणत्याही चौकशीला सामोरं जाण्यासाठी तयार आहे.”

सीबीआयच्या नोव्हेंबर २०२० च्या एफआयआरनंतर ईडीने हा खटला दाखल केला होता. आसनसोलच्या आसपासच्या ईस्टर्न कोलफील्डच्या काही खाणींमधून कोट्यवधी रुपयांचा कोळसा चोरीला गेल्याचा सीबीआयचा आरोप आहे. या प्रकरणात अनूप मांझी उर्फ ​​लाला मुख्य संशयित असल्याचे सांगितलं जात आहे.

एका दिवसापूर्वी अभिषेक बॅनर्जी यांनी आपल्या एका वक्तव्यात म्हटलं होतं की, जर कोणत्याही केंद्रीय एजन्सीनं कोणत्याही बेकायदेशीर व्यवहारात त्यांचा सहभाग सिद्ध केला, तर ते स्वतः फासावर जातील. ईडीसमोर चौकशीला हजर राहण्यापूर्वी कोलकाता विमानतळावर पत्रकारांशी संवाद साधताना राज्यात पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये झालेल्या पराभवामुळं भाजप राजकीय बदला घेत आहे, असा आरोप केला आहे.

हे ही वाचा:

समोरच्यांवर बोलण्यापेक्षा आपल्या पक्षातल्या लोकांना आधी शिकवावं

जाहीर चर्चा करा नाही तर जाहिररित्या माफी मागा

पंजशीरवर कब्जाचा तालिबानकडून दावा

तालिबान-हक्कानी अफगाणिस्तान सत्तेचा वाद पेटला

दरम्यान, ईडीनं टीएमसी खासदार आणि ममता बॅनर्जी यांचे पुतणे अभिषेक बॅनर्जी आणि त्यांची पत्नी रुजीरा यांना समन्स बजावले आहे. तपास यंत्रणेने अभिषेक यांची पत्नी रुजीराला १ सप्टेंबरला बोलावलं होतं. मनी लाँडरिंग आणि कोळसा घोटाळा प्रकरणात या दोघांचीही चौकशी केली जाणार आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
148,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा