30 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
घरदेश दुनियापंजशीरवर कब्जाचा तालिबानकडून दावा

पंजशीरवर कब्जाचा तालिबानकडून दावा

Google News Follow

Related

अफगाणिस्तानमध्ये अजून तालिबान्यांचं रितसर राज सुरुही झालेलं नाही पण रोज नवे कारनामे समोर येतायत. त्यातल्याच एका घटनेनं लहान मुलांसह १७ जणांचा जीव घेतलाय. पंजशीर खोऱ्यात सध्या तालिबानी आणि नॉर्दन अलायन्स यांच्यात जोरदार लढाई सुरु आहे. त्यात पाकिस्तान मीडिया हा तालिबान्यांच्या बाजूनं रोज नव्या अफवा पसरवतोय. पंजशीर व्हॅलीवर तालिबान्यांनी कब्जा केल्याची अफवा पसरली आणि त्याचा आनंद साजरा करण्यासाठी त्यांनी राजधानी काबूलमध्ये जोरदार गोळीबार केला, तोही हवेत. पण ह्या गोळीबारानं अनेकांचा जीव घेतला. आपला आनंद साजरा करताना, आपण स्वत:च्याच लोकांचे जीव घेतोय याचा विसरही तालिबान्यांना पडला.

अफगाणिस्तानमध्ये सध्या दोन वृत्तसंस्था आहेत. एक टोलो न्यूज, ज्याचं टीव्ही न्यूज चॅनलही आहे आणि दुसरी असवाका न्यूज एजन्सी. दोन्ही वृत्तसंस्थांनी दिलेल्या वृत्तानुसार- शुक्रवारी रात्री काबूलमध्ये तालिबाननं जो आनंदात गोळीबार केला, त्यात १७ जणांना जीव गमवावा लागलाय तर ४१ जण जखमी झालेत. टोलो न्यूजनं ट्विट केलंय- काबूलच्या आपातकालीन हॉस्पिटलमध्ये १७ मृतदेह आलेले आहेत. ४१ जणांना उपचारासाठी विशेष कक्षात पाठवलंय. बळी गेलेल्यांमध्ये लहान मुलांचाही समावेश आहे पण त्यांची नेमकी संख्या मात्र उघड केली जात नाहीय. तर असवाका न्यूजनुसार- पंजशीर घाटीवर नियंत्रण मिळवल्याचं वृत्त काबूलमध्ये धडकलं आणि आनंदी झालेल्या तालिबान्यांनी हवेत जोरदार गोळीबार केला. त्याचं फोटो, व्हिडीओही आता व्हायरल झालेत. असवाकानेही काही फोटो ट्विट केलेत. अनेक जण स्वत:च्या कुटुंबियांना हॉस्पिटलमध्ये जखमी अवस्थेत आणत असल्याचे फोटोही ट्विट केले गेलेत.

हे ही वाचा:

तालिबान-हक्कानी अफगाणिस्तान सत्तेचा वाद पेटला

… तर माझ्या डोक्यात दोन गोळ्या झाडा

वाट लावणाऱ्या तालिबानला सत्तेसाठी पाहावी लागणार वाट!

‘जनआर्शीवाद यात्रेने विरोधकांचे धाबे दणाणले’

तालिबाननं बंदुकीच्या जोरावर अफगाणिस्तानवर कब्जा मिळवला पण पंजशीरवर त्यांना अजूनही ताबा मिळवता आलेला नाही. इथं माजी उपराष्ट्रपती अमरुल्ला सालेह आणि नॉर्दन अलायन्सचे नेते त्यांच्या सैनिकांसह लढतायत. तालिबानच्या कमांडरनं दावा केला की- अफगाणिस्तानमध्ये राष्ट्रीय प्रतिरोध मोर्चा पराभूत झालाय. अल्लाहच्या कृपेनं संपूर्ण पाकिस्तानवर आता आमचा (तालिबानचा) कब्जा आहे. जे स्वत:ला संकटमोचक मानत होते त्यांचा पराभव झालाय आणि पंजशीर आता आमच्या ताब्यात आहे. पाकिस्तानी मीडियानेही तालिबानला साजेशे असेच रिपोर्ट प्रसारीत केले. पण खुद्द तालिबाननं मात्र याबाबत कुठलही अधिकृत दावा केलेला नाही. आंतरराष्ट्रीय न्यूज एजन्सी एएफपीनं स्थानिकांच्या हवाल्यानं बातमी देत, अफगाणिस्तानमध्ये राष्ट्रीय प्रतिरोध मोर्चाच्या पराभवाचं वृत्त खोटं असल्याचं म्हटलंय.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
148,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा