34 C
Mumbai
Friday, April 26, 2024
घरदेश दुनियातालिबान-हक्कानी अफगाणिस्तान सत्तेचा वाद पेटला

तालिबान-हक्कानी अफगाणिस्तान सत्तेचा वाद पेटला

Google News Follow

Related

अफगाणिस्तानमध्ये अनागोंदीची स्थिती तयार झालीय. तालिबानने अफगाणवर ताबा मिळावला. मात्र, इतके दिवस होऊनही अफगाणमध्ये सरकार स्थापन होऊ शकलेलं नाही. यामागे तालिबान आणि हक्कानी नेटवर्कमधील वादाचं कारण असल्याचं बोललं जात होतं. मात्र, आता यावर शिक्कामोर्तब झालंय. काल सत्तेवरुन तालिबान आणि हक्कानी नेटवर्कचे समर्थक थेट भिडले. यावेळी झालेल्या गोळीबारात तालिबानचा सह-संस्थापक मुल्ला बरादर जखमी झालाय.

दोहा शांतता चर्चेत समावेशक सरकार स्थापन करण्याचं आश्वासन देणारं तालिबान हक्कानी नेटवर्कच्या भूमिकेने अडचणीत येतंय. तालिबानचा सह-संस्थापक मुल्ला अब्दुल गनी बरादर अल्पसंख्यक समुहांना सरकारमध्ये सहभागी करण्याचा प्रयत्न करत आहे. दुसरीकडे तालिबानचा उपनेता सिराजुद्दीन आणि त्याची दहशतवादी संघटना हक्कानी नेटवर्क कुणाही सोबत सत्ता वाटून घेण्याला विरोध करत आहे. अशातच आता या दोन्ही गटांमध्ये झडप झाली. परिस्थिती इतकी चिघळली की गोळीबार झाला. यात मुल्ला बरादर जखमी झाला.

पंजशीर ऑब्जर्वर आणि एनएफआरने दिलेल्या वृत्तानुसार, या भांडणात गोळीबारही झाला. त्यामुळेच तालिबानने सरकार स्थापन करणं पुढे ढकललं आहे. सरकारचं नेतृत्व करणारा मुल्ला बरादर सध्या उपचार घेत आहे. हक्कानी नेटवर्क आगामी सरकार मध्ययुगीन काळाप्रमाणे कट्टर असावं असा आग्रह करत आहे. तसेच यात काहीही आधुनिक नसावा यासाठी दबाव आणत आहे.

हे ही वाचा:

… तर माझ्या डोक्यात दोन गोळ्या झाडा

वाट लावणाऱ्या तालिबानला सत्तेसाठी पाहावी लागणार वाट!

‘जनआर्शीवाद यात्रेने विरोधकांचे धाबे दणाणले’

किती मासे गळाला लागले त्याची होणार आता अशी मोजदाद

एकिकडे तालिबानने अफगाणिस्तानची राजधानी काबुल शहर आपण जिंकल्याचा दावा केलाय, तर दुसरीकडे हक्कानी नेटवर्क हे शहर आपण जिंकल्याचा दावा करत आहे. त्यामुळे या दोन्ही गटांमधील मतभेद कमालीचे वाढल्याचं स्पष्ट होतंय. त्यातच पाकिस्तानची गुप्तहेर संघटने आयएसआयचे प्रमुख लेफ्टिनंट जनरल फैज हमीद सध्या काबुलमध्ये आहेत. ते या दोन्ही गटांमध्ये समेट घडवून आणण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, त्यातही पाकिस्तानसाठी हक्कानी गट अधिक जवळचा असल्याची चर्चा आहे. त्यामुळे हक्कानी गटाच्या मागण्यांना अधिक महत्त्व दिलं जात आहे. यात तालिबानवरील दबाव मात्र वाढताना दिसत आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
148,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा