28.7 C
Mumbai
Wednesday, October 28, 2026
घरदेश दुनियामतदारांसाठी काहीही... ममता बॅनर्जी नाचल्या!

मतदारांसाठी काहीही… ममता बॅनर्जी नाचल्या!

Google News Follow

प.बंगालमध्ये निवडणुकांचा माहोल आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आपली खुर्ची टीकवण्यासाठी हीरीरीने प्रचारात उतरल्या असून संगीत महोत्सवात त्या लोकाग्रहास्तव चक्क नाचल्या. लोकांना त्यांचे एक वेगळेच रूप पहायला मिळाले. परंतु काही वेळातच मुळ पदावर येत त्यांनी भाजपावर भरपूर तोंडसुख घेतले.

कोलकात्यातील संगीत महोत्सवाचे उद्घाटन करायला बॅनर्जी  आल्या होत्या. याप्रसंगी त्यांनी काही सांस्कृतिक कलाकार, गायक, वादक यांचा सत्कारही केला. प्रसिद्ध संथाल नर्तिका बसंती हेम्बराम यांचा सत्कार केल्या नंतर त्यांनी ममता दीदींना नाचण्याचा आग्रह केला. निवडणूका तोंडावर असल्याने लोकाग्रह मोडणे दीदींनाही परवडणारे नाही. त्यामुळे दीदींनीही ठेका धरला.

ममता बॅनर्जी या चित्रकार आहेत. त्यांच्या चित्रे काही उद्योगपतींनी लाखो रुपये मोजून विकत घेतली आहेत. त्यांचे ‘का का छी छी’ हे सांगितीक भाषणही चांगलेच प्रसिद्ध झाले होते. आज त्यांचा एक नवा पैलू जनतेसमोर आला.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
340,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा