33 C
Mumbai
Thursday, April 23, 2026
घरक्राईमनामाआर्यन खानला चौकशीआधीच ताप भरला?

आर्यन खानला चौकशीआधीच ताप भरला?

Google News Follow

Related

क्रूझ ड्रग्ज प्रकरणाची चौकशी करण्यासाठी शनिवारी मुंबईत आलेल्या एनसीबीच्या विशेष तपास पथकाने सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला समन्स बजावले होते. सौम्य ताप असल्यामुळे आर्यन खान एनसीबीच्या विशेष तपास पथकासमोर हजर झाला नाही. एनसीबीच्या हवाल्याने एएनआयने ही माहिती दिली आहे.

आर्यन उद्या म्हणजेच सोमवारी एनसीबीच्या विशेष तपास पथकासमोर हजर होण्याची शक्यता आहे. त्यासाठी त्याला पुन्हा समन्स बजावण्यात आले आहे. हे विशेष तपास पथक ड्रग्ज पार्टी प्रकरणातील आरोपींचे जबाब नोंदवत आहे.

ही टीम आर्यन खान आणि अरबाज खान यांचे जबाबही नोंदवणार आहे. एका वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, एसआयटी महाराष्ट्राचे मंत्री नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांचाही जवाब नोंदवणार आहे. समीर खानला एनसीबीने जानेवारीत अटक केली होती, तो सध्या जामिनावर बाहेर आहे.

हे ही वाचा:

पाकिस्तानी कोर्टाने हाफीज सईदच्या सहकाऱ्यांना निर्दोष सोडले

पाक नौदलाने केली भारतीय मच्छिमाराची हत्या

अनिल देशमुखांना १२ नोव्हेंबरपर्यंत ईडी कोठडी

महाराष्ट्रातील अर्बन क्रेडिट कोऑपरेटिव्ह बँकेवर आयकर विभागाचे छापे

वरिष्ठ आयपीएस अधिकारी संजय कुमार सिंह यांनी एका वृत्तवाहिनीला सांगितले की, आर्यन खानला शनिवारी समन्स बजावण्यात आले असून रविवारी त्याला एसआयटीसमोर हजर राहण्यास सांगितले आहे. संजय कुमार सिंह यांनी सांगितले की, आम्ही या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. एनसीबी कार्यालयात सकाळपासून वरिष्ठ आयपीएस अधिकारी उपस्थित होते.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
303,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा