31 C
Mumbai
Friday, March 29, 2024
घरअर्थजगतमहाराष्ट्रातील अर्बन क्रेडिट कोऑपरेटिव्ह बँकेवर आयकर विभागाचे छापे

महाराष्ट्रातील अर्बन क्रेडिट कोऑपरेटिव्ह बँकेवर आयकर विभागाचे छापे

Google News Follow

Related

५० कोटींपेक्षा अधिक रक्कम जप्त

महाराष्ट्रातील अर्बन क्रेडिट कोऑपरेटिव्ह बँकेवर आयकर विभागाने कारवाई केली आहे. ऑक्टोबर महिन्याच्या २७ तारखेला आयकर विभागामार्फत ही छापेमारी करण्यात आली आहे. यावेळी बँकेच्या मुख्यालयावर आणि एका शाखेवर आयकर विभागाने धाडी टाकल्या होत्या. तर बँकेचे अध्यक्ष आणि एका संचालकाच्या घरी देखील छापेमारी करण्यात आली.

या बँकेत नवीन खाती उघडताना अनियमितता असल्याचे आयकर विभागाच्या लक्षात आले होते. तर नवीन खाते उघडताना आवश्यक त्या बाबींची पुर्तता केली जात नसल्याचेही आयकर विभागाच्या निदर्शनास आले होते. कोअर बँकिंग सोल्युशन्स (CBS) वरील बँकेच्या डेटाचे विश्लेषण आणि शोध कारवाईदरम्यान नोंदवलेल्या महत्त्वाच्या व्यक्तींच्या निवेदनावरून आयकर विभागाला ही माहिती मिळाली होती.

या बँकेच्या शाखेत १२०० हून अधिक नवीन बँक खाती पॅनकार्ड शिवाय उघडण्यात आली आहेत. तर केवायसी नियमांचे पालन न करता ही बँक खाती उघडण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे खाती उघडण्याचे सर्व फॉर्म खातेधारकांनी न भारत बँक कर्मचाऱ्यांनीच भरले आहेत आणि त्यावर त्यांनी त्यांच्या स्वाक्षरी किंवा अंगठ्याचे ठसे उमटवलेले आहेत.

हे ही वाचा:

PM मोदी पुन्हा अव्वल

नवाब मालिकांविरुद्ध सव्वा कोटीचा अब्रू नुकसानीचा दावा

दाऊदचा साथीदार चिंकू पठाण सोबत अनिल देशमुख काय करत होते?

आर्यन खान प्रकरण बनाव, सुनील पाटीलचा सहभाग

या सर्व खात्यांत, प्रत्येकी १.९ लाख रुपयांच्या रोख ठेवी असून त्यांचे एकूण मूल्य रुपये ५३.७२ कोटी इतके आहे. यापैकी ३४.१० कोटी पेक्षा जास्त ठेवी असलेली ७०० पेक्षा अधिक बँक खाती उघडकीस आली आहेत. यात प्रामुख्याने ऑगस्ट २०२० ते मे २०२१ या कालावधीत ही बँक खाती उघडल्यापासून ७ दिवसांच्या आत ३४.१० कोटी रुपयांच्या ठेवी ताबडतोब ठेवण्यात आल्या होत्या. २ लाख रुपयांपेक्षा जास्त रोख ठेवींसाठी अनिवार्य अशा पॅन कागदपत्रांची असलेली गरज टाळण्यासाठी या ठेवी ठेवण्यात आल्या आहेत. नंतर हीच रक्कम त्याच शाखेतील मुदत ठेवींमध्ये रूपांतरित केली गेली आहे.

काही खातेदारांच्या स्थानिक चौकशीत असे दिसून आले आहे, की या व्यक्तींना बँकेतील या आपल्या अशा रोख ठेवींची अजिबात कल्पना नाही आणि त्यांनी अशा बँक खात्यांची किंवा अगदी मुदत ठेवींची कोणतीही माहिती नसल्याचे सांगितले. तर बँकेचे अध्यक्ष, मुख्य व्यवस्थापकीय संचालक, आणि शाखा व्यवस्थापक, या रोख ठेवींचे स्त्रोत स्पष्ट करू शकले नाहीत. तर दुसरकडे त्यांनी हे मान्य देखील केले की हे काम त्यांनी धान्याच्या व्यापारात गुंतलेल्या एक प्रमुख स्थानिक व्यापारी याच्या सांगण्यावरून केले. हे बँकेचे संचालक सुद्धा आहेत. जमा केलेल्या पुराव्यांतून एकूण ५३. ७२ कोटींची रक्कम आयकर विभागातर्फे ताब्यात घेण्यात आली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
144,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा