28.8 C
Mumbai
Sunday, November 8, 2026
घरराजकारणआसाम-मिझोराम सीमासंघर्षाला हिंसक वळण

आसाम-मिझोराम सीमासंघर्षाला हिंसक वळण

Google News Follow

आसाम आणि मिझोरम या दोन राज्यांमध्ये सीमावादावरुन संघर्ष पेटला असून त्याने हिंसक रुप धारण केलं आहे. नागरिक आणि सुरक्षा रक्षकांमध्ये झालेल्या झडपेमध्ये गोळीबाराची घटना घडली असून त्यामध्ये सहा पोलीस कर्मचारी मृत्यूमुखी पडले आहेत तर ५० कर्मचारी जखमी झाले आहेत. या दोन राज्यांतील नागरिकांमध्ये सुरु असलेल्या वादावर आता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा आणि मिझोरमचे मुख्यमंत्री जोरमथांगा यांच्याशी फोनवरुन चर्चा केली असून दोन्ही राज्यांनी सीमेवर शांतता नांदावी यासाठी प्रयत्न करावेत असं आवाहन केलं आहे.

आसामच्या बराक घाटीतील कछार, करीमगंज आणि हैलाकांडी या तीन जिल्ह्यांच्या आणि मिझोरमच्या आयझॉल, कोलसिब आणि मामित या जिल्ह्यांची १६४ किमीची सीमा लागून आहे. गेल्या वर्षी, ऑगस्ट २०२० मध्ये या दोन राज्यातील नागरिकांमध्ये सीमेवरुन वाद झाला होता.

आसाम आणि मिझोरम ही दोन्ही राज्ये पर्वतीय भागाची असून या राज्यांतील नागरिकांमध्ये जमिनीच्या लहान-लहान तुकड्यांवरुन नेहमी वाद होतो. नुकतंच आसामच्या पोलिसांनी मिझोरमच्या नागरिकांना या सीमेवर शेती करण्यासाठी बंदी आणली आणि त्यांना तिथून हाकलवून लावलं होतं. त्यामुळे या दोन्ही राज्यांत सीमावादावरुन नव्याने वाद निर्माण झाला आहे.

हे ही वाचा:

महिला भिकारणीला फेकले स्कायवॉकवरून 

२६ जुलैनंतर १६ वर्षे तीच स्थिती

मरीन ड्राईव्हमध्ये ८ वकिलांविरुद्ध लैगिंग अत्याचार, खंडणीचा गुन्हा

कंगना प्रकरणात जावेद अख्तर यांना कोर्टाने काय सुनावले?

एटलांग नदीच्या परिसरातील आठ झोपड्यांना आसाम पोलिसांनी आग लावल्याचा आरोप मिझोरमच्या पोलिसांनी केला आहे. त्यामुळे मिझोरमच्या नागरिकांमध्ये असंतोष पसरल्याचं सांगण्यात येतंय. तर मिझोरमच्या नागरिकांनी आसामच्या पोलिसांवर गोळीबार केल्याचा आरोप आसाम पोलिसांकडून करण्यात आला आहे.

आसामच्या मुख्यमंत्र्यांनी सहा पोलिसांच्या मृत्यूवर शोक व्यक्त केला असून या सहा कर्मचाऱ्यांनी राज्याच्या सीमेचे रक्षण करताना बलिदान दिल्याचं त्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
341,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा