34 C
Mumbai
Thursday, March 26, 2026
घरराजकारणपावसाळी अधिवेशनाची वादळी सुरुवात; विधानसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब

पावसाळी अधिवेशनाची वादळी सुरुवात; विधानसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब

विरोधकांकडून सभात्याग

Google News Follow

Related

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सोमवार, १७ जुलै पासून सुरुवात झाली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, यांच्यासह मंत्रीमंडळातील सदस्य तसेच विधानसभा सदस्य उपस्थित होते. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला राष्ट्रगीत, वंदेमातरम् आणि राज्यगीताने सुरुवात झाली.

त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार, अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ, सहकार मंत्री दिलीप वळसे- पाटील, वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ, कृषीमंत्री धनंजय मुंडे, अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम, क्रीडा व युवक कल्याण, बंदरे मंत्री संजय बनसोडे, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, मदत व पुनर्वसन आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांचा परिचय विधानसभेत करुन दिला.

तर, संजय शिरसाट, समीर कुनावर, यशवंत माने, अमित जनक यांची विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात तालिका अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

दिवंगत खासदार आणि माजी मंत्री गिरीश बापट, दिवंगत खासदार सुरेश धानोरकर, माजी आमदार शंकरराव लिंबाजीराव वाकुळणीकर (कोळकर), बाबुरावजी वाघमारे आणि माजी आमदार रामचंद्र अवसरे यांच्या निधनानंतर विधानसभेत शोकप्रस्ताव सादर करण्यात आला.

हे ही वाचा:

दहशतवादी संघटनांसाठी काम करणारे जम्मू- काश्मीरमधील तीन अधिकारी बडतर्फ

मराठी गणितज्ञ डॉ. मंगला नारळीकर यांचे निधन

वंदे भारत एक्स्प्रेसच्या बॅटरी बॉक्सला आग

दुगारवाडी धबधब्यात १७ वर्षीय तरुण गेला वाहून

पावसाळी अधिवेशनाच्या सुरुवातीलाच शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विरोधकांनी आवाज उठवून आक्रमकता दाखवली. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी प्रश्न उपस्थित केले. त्यावर सत्ताधाऱ्यांकडून अपेक्षित उत्तर न मिळाल्याने विरोधकांनी विधानसभेतून सभात्याग केला. त्यानंतर विधानसभा स्थगित करण्यात आली. दरम्यान, विधानसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
300,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा