28.4 C
Mumbai
Friday, October 9, 2026
घरराजकारणकांदिवलीत सजली पंचतारांकित देखणी भिंत

कांदिवलीत सजली पंचतारांकित देखणी भिंत

मजबुती आणि सौंदर्यीकरण केलेल्या भिंतीचे भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी केले लोकार्पण

Google News Follow

Related

कांदिवली पूर्व येथील पश्चिम द्रूतगती महामार्गाजवळ बांधलेल्या संरक्षक भिंतीचे सौंदर्यीकरण रविवारी करण्यात आले. कांदिवली पूर्वचे भाजपा आमदार अतुल भातखळकर यांच्या हस्ते या नव्या रूपातील संरक्षक भिंतीचे उद्घाटन करण्यात आले. या भिंतीला एखाद्या पंचतारांकित हॉटेलच्या भिंती सारखे सजवण्यात आले आहेत.

या भिंतीच्या मागे असलेल्या डोंगरामुळे भूस्खलन होत असल्यामुळे आणि लोकांच्या जीवाला धोका असल्यामुळे ही मजबूत संरक्षक भिंत बांधण्यात आली. आता त्या भिंतीचे सौंदर्यीकरण करून त्या परिसराचे रूप पालटण्याचा प्रयत्नही करण्यात आला आहे. या सौंदर्यीकरणामुळे लोकांना चालण्यासाठी चांगला मार्गही तयार झाला आहे.

हे ही वाचा:

भ्रष्टाचाराच्या आरोपांवर मुख्यमंत्री मान यांच्या सहाय्यकाची सीबीआय चौकशी

रशियात ‘प्लेग’ची भीती? लॅब संशोधकाच्या मृत्यूनंतर २०० जण क्वारंटाइन

भारत संकटात असताना रशिया पाठीशी!

केरळमधून सौदी आणि बहरीनला थेट विमानसेवा

या भिंतीवर जय जय महाराष्ट्र माझा, ने मजसी ने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला, मनुष्याने माणूस म्हणून जगले पाहिजे…अवघा रंग एक झाला..वृक्षवल्ली आम्हा सोयरी…शिका…संघटित व्हा…संघर्ष करा…अशी संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी उद्धृत केलेली बोधपर वाक्ये या भिंतीवर रेखाटण्यात आली आहेत. शिवाय, त्यावर या भिंतीवर विद्युतीकरणाच्या माध्यमातून सुशोभीकरणात भर घालण्यात आली आहे. पादचाऱ्यांसाठी तिथे बसण्याची व्यवस्थाही करण्यात आली आहे. त्यामुळे या भागाचा चेहरामोहरा बदलला आहे.

यासंदर्भात आमदार अतुल भातखळकर यांनी सांगितले की, याठिकाणी काही वर्षांपूर्वी रस्ताही नव्हता. इथे भूस्खलनही होत होते. त्यासाठी ही संरक्षक भिंत बांधण्यात आली. याच भिंतीचे आता सौंदर्यीकरणे करण्यात आले आहे. या भिंतीचे लोकार्पण आता झालेले आहे. त्यामुळे या परिसराला नवी झळाळी प्राप्त झाली आहे. एका अर्थाने जनतेचे संरक्षणही झाले आणि परिसराचे सौंदर्यीकरणही झाले आहे. जनेताला अधिकाधिक सुविधा मिळाव्यात, शहराच्या सौंदर्यीकरणातही भर पडली पाहिजे. या भिंतीच्या मागे मोठा डोंगर आहे. त्यासाठीच ही संरक्षक भिंत बांधण्यात आली. त्याचे आता लोकार्पण करण्यात आले आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
337,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा