38 C
Mumbai
Monday, April 29, 2024
घरराजकारण'मातोश्री' जवळ शिवसेनेला धक्का

‘मातोश्री’ जवळ शिवसेनेला धक्का

Google News Follow

Related

वांद्रे पूर्व मध्ये शिवसेनेला जबर धक्का बसला आहे. कारण शिवसेनेच्या विधानसभेच्या बंडखोर उमेदवार आणि माजी आमदार बाळा सावंत यांच्या पत्नी तृप्ती सावंत यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे.

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत तृप्ती सावंत यांचं तिकीट कापून, शिवसेनेने तत्कालिन महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना उमेदवारी दिली होती. त्यावेळी तृप्ती सावंत यांनी बंडखोरी केली होती. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या मतदारसंघातील शिवसेनेचा उमेदवार पराभूत झाला होता. इथे काँग्रेसचा उमेदवार झिशान सिद्दीकी यांनी बाजी मारली होती.

२०१५ मध्ये आमदार बाळा सावंत यांचं निधन झाल्याने, शिवसेनेने पोटनिवडणुकीत तृप्ती सावंत यांना तिकीट दिलं होतं. त्यावेळी त्यांच्याविरोधात नारायण राणे होते. मात्र तृप्ती सावंत यांनी बाजी मारुन विधानसभेत प्रवेश केला होता.

२०१५ मध्ये शिवसेनेचे तत्कालीन आमदार बाळा सावंत यांचं निधन झाल्यामुळे पोटनिवडणूक जाहीर झाली होती. शिवसेनेने प्रकाश सावंत यांची पत्नी तृप्ती सावंत यांनाच उमेदवारी दिली. तृप्ती सावंत पोटनिवडणुकीत काँग्रेस उमेदवार आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणेंना हरवून जवळपास २० हजारांच्या मताधिक्याने जिंकून आल्या होत्या.

हे ही वाचा:

उद्धव ठाकरे यांच्या हातामध्ये राज्य आलंय की उद्धव ठाकरे यांच्यावर राज्य आलंय?

बडे बेआबरु होकर निकले तेरे कुचे से

भाजपा देशवासियांचे हृदय जिंकणारे अनव्रत अभियान आहे

सचिन वाझेचा पुन्हा एकदा सीएसएमटी- कळवा प्रवास

यंदाच्या तिकीटवाटपावेळी शिवसेनेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या या ‘वांद्रे पूर्व’ मतदारसंघात तिढा निर्माण झाला होता. अखेर विद्यमान आमदार तृप्ती सावंत यांना डावलत शिवसेनेने उमेदवारीची माळ मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या गळ्यात टाकली गेली. त्यामुळे नाराज झालेल्या तृप्ती सावंत यांनी बंडाचं निशाण फडकावलं होतं.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
149,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा